अतिसंवेदनशील येलचील येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना
By Admin | Updated: April 3, 2017 02:20 IST2017-04-03T02:20:20+5:302017-04-03T02:20:20+5:30
तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त येलचील येथे रविवारी नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली

अतिसंवेदनशील येलचील येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना
इमारतीचे काम सुरू : एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र
अहेरी : तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त येलचील येथे रविवारी नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून आजपासून पोलीस मदत केंद्राच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
पोलीस मदत केंद्र स्थापन कार्यक्रमाचे औचित्य साधून येलचील येथील जि.प. शाळेत पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (नक्षल अभियान), अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए. राजा, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, एटापल्लीचे एसडीपीओ नितीन जाधव, अहेरीचे पोलीस निरिक्षक संजय मोरे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, होमगार्ड समादेशक अधिकारी जलीलोद्दीन काझी, ग्रामसेवक उंदीरवाडे, येलचीलचे ग्रा.पं.सदस्य किशोर आत्राम, पोलीस पाटील लालू तलांडे, वन समितीचे अध्यक्ष पाटाळी गावडे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू मडावी, लालू मडावी, दीपक माली, श्यामराव अलाम आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात पथनाट्याद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महेश्वर रेड्डी, ए. राजा, गजानन टोंपे यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
पोलीस विभागातर्फे महिलांना साडी व पुरूषांना ड्रेस तसेच युवकांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक किशोर मेंढे यांनी केले. जनजागरण मेळावा व पोलीस मदत केंद्र इमारत बांधकामाच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक शिवाजी नन्नावरे, गजानन पाटील, कोळेकर, बगाटे, दत्ता दराडे, भगवान पालवे, गणेश होळकर, महेश वाघमारे, बाबर, खाटपे, निलेश पोळ, सोहेल पठाण, जयसिंग राजपूत, विटेकरी यांच्यासह सी-६० जवान, क्युआरटी जवान, एसआरपी, श्वान पथक, बॉम्बशोधक पथकाच्या जवानांनी पार पाडली. या कार्यक्रमाला येलचील परिसरातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पहिले प्रभारी पोलीस अधिकारी पाटील
आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचील गावात पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. दुर्गम व आदिवासी संवेदनशील भागात पोलीस विभागातर्फे पोलीस मदत केंद्राचे जाळे उभारण्यात आल्याने नागरिकांना पोलिसांची मदत होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या येलचील पोलीस मदत केंद्राचे पहिले प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून संदीप पाटील काम पाहणार आहेत.
पोलीस विभागातर्फे सदर कार्यक्रमस्थळी उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुलर व बोरींग व तंबूची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत या पोलीस मदत केंद्रातून मोर्चेही सुरू करण्यात आले. गडचिरोली पोलीस विभागातर्फे यापूर्वी सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, एटापल्ली तालुक्यात बुर्गी व चामोर्शी तालुक्यात रेगडी येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे.