कोविड सारख्या व इतर येणाऱ्या महामारीचा सामना करण्यासाठी तालुकास्तरावर आरोग्य यंत्रणा व सोयीसुविधा अधिक बळकट करण्यासाठी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष केंद्रित करावे. तालुका स्तरावर जर सर्व सुविधायुक्त शंभर खाटाचे स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारल्यास तालुक्यातील रुग्णावर तालुक्याचं उपचार करणे सोईस्कर होईल .त्यामुळे तज्ञ डॉक्टर, व्हेंटिलेटर, आक्सिजन व विविध तपासणी यंत्रासह सर्व सोयीसुविधा युक्त रुग्णालय तालुका स्तरावर उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. कोरोना आला म्हणून केअर सेंटर उभारण्यापेक्षा भविष्यात कोरोना सारख्या इतर आजाराचा सामना करण्यासाठी व वर्षभर इतर आजारावर सुद्धा तालुक्यातच उपचार व शस्त्रक्रिया करणे सुलभ जाईल. यासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तालुकास्तरावर निर्माण करणे काळाची गरज आहे. जर प्रत्येक तालुका स्तरावर केंद्र व राज्य शासनाने सर्वसोयीसुविधा असलेली रुग्णालय उभारल्यास तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी इतरत्र भटकण्याची वेळ येणार नाही.. यासाठी आरमोरीसह तालुकास्तरावर किमान १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात यावे आणि यासाठी खासदार व आमदार यांनी सुद्धा आपल्या विकास निधीतुन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हंसराज बडोले, राजू गारोदे, श्रीनिवास आंबटवार, राहुल तितिरमारे, चिंतामण ढवळे, नादिर सय्यद सह अन्य नागरिकांनी केली आहे.
आरमोरीसह तालुकास्तरावर सर्व स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST