विद्यार्थी परीक्षेस होणार प्रविष्ट
By Admin | Updated: July 19, 2014 23:55 IST2014-07-19T23:55:02+5:302014-07-19T23:55:02+5:30
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मार्च २०१४ व त्यापूर्वीच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सप्टेंबर-आॅक्टोबर

विद्यार्थी परीक्षेस होणार प्रविष्ट
पुनर्रचित अभ्यासक्रमात : अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सप्टेंबरपासून समावेश
देसाईगंज : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मार्च २०१४ व त्यापूर्वीच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सप्टेंबर-आॅक्टोबर २०१४ मधील परीक्षेस पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार प्रविष्ट व्हावे लागणार आहे. अशा प्रकारचा ठराव नुकताच कार्यकारी परीक्षेत झाला असून त्याची अंलबजावणी येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरच्या बोर्डाच्या परीक्षेपासून होणार आहे.
इयत्ता दहावी गणित व सामान्य गणित या विषयाची नवीन अभ्यासक्रमानुसार १०० गुणांची प्रथम परीक्षा मार्च २०१४ मध्ये घेण्यात आली. मार्च २०१४ व त्यापूर्वी सदर विषयाची परीक्षा १५० गुणांची होती व त्यापैकी ३० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी होते. आत गणित व सामान्य गणित या विषयासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार निर्धारीत केलेले ८० गुण लेखी परीक्षेसाठी अंतर्गत मूल्यमापनासाठी राहणार आहेत. २० गुणांसाठी अनुत्तीर्ण खासगी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून सदरचे अंतर्गत त्या-त्या शाळांमधून प्राप्त करून घेता येईल. तसेच १० वी, १२ वीच्या २०१४ तील भाषा विषयातील २० गुणांची तोंडी परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार द्यावी लागणार आहे. सामाजिकशास्त्र (वर्ग १०) विषयाच्या अंतर्गत खासगी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. १० वीसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा विषय नव्याने अनिवार्य विषय म्हणून अंतर्भूत केला आहे. मार्च २०१४ च्या जुन्या व त्यापूर्वीच्या अभ्यासक्रमाचे अनुर्त्तीण विद्यार्थ्यांना या विषयाची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. मात्र २०१४ च्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार द्यावी लागेल. वर्ग १२ वी, ज्या विषयांना प्रकल्प व अंतर्गत कार्य निर्धारित केले आहे. अशा विषयाची ८० गुणांची लेखी परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होईल. मात्र या विषयाचे प्रकल्प अंतर्गत कार्य त्यांना करावे लागेल. ही जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची राहणार आहे. ज्या विषयांना प्रात्यक्षिक निर्धारित केली आहे. अशा विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा पुनश्च घ्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार अनुत्तीर्ण झाले असतील त्यांना आरोग्य व शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण या विषयाची परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र आरोग्य व शारीरिक शिक्षण या शालेय श्रेणी परीक्षेस प्रविष्ट व्हावे लागेल, तसेच पर्यावरण शिक्षण विषयाचे प्रकल्प पूर्ण करावे लागतील, मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षाही नव्याने द्यावी लागेल. व्यावसायिक व द्विलक्षी या विषयाच्या अभ्यासक्रमात व मूल्यमापन योजनेत बदल नसल्याने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पध्दतीने होतील. त्यामुळे पुनर्परीक्षार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार यापूर्वी दोन संधी देण्यात आलेल्या असल्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबर २०१४ च्या परीेक्षेच्या वेळी पुनश्च संधी नाकारण्यात आल्याने आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांना २०१४ ची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार प्रविष्ट व्हावे लागणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)