शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आरसेटीतर्फे १६८१ युवकांना रोजगार

By admin | Updated: April 6, 2017 01:29 IST

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्टार स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने २०१७ पर्यंत

पत्रकार परिषदेत माहिती : गतवर्षी ८६६ युवकांना प्रशिक्षण गडचिरोली : केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्टार स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने २०१७ पर्यंत कालावधीत सुमारे २ हजार ३४८ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १ हजार ६८१ प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक पी. डी. काटकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी आरसेटीची स्थापना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ जानेवारी २०१० साली या संस्थेची स्थापना झाली. मात्र प्रत्यक्ष कार्याला २०१५ पासून सुरुवात झाली. प्रशिक्षणार्थ्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना त्या-त्या प्रकारचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण आरसेटीच्या माध्यमातून दिले जाते. किमान सहा दिवस ते एक महिना हा प्रशिक्षणाचा कालावधी राहतो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सदर व्यक्तीने स्वयंरोजगार स्थापन करावा, यासाठी आरसेटी संस्था स्वत: पुढाकार घेऊन विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते. प्रशिक्षण प्राप्त केलेल्या एकूण २ हजार ३४८ प्रशिक्षणार्थ्यांपैकी १ हजार ६८१ प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ४३९ प्रशिक्षणार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून ६ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. २०१६-१७ मध्ये २९ बॅचेसमधून ८६६ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये एकूण ७५० युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. आरसेटीच्या माध्यमातून बकरी पालन, ब्युटी पार्लर, कुकुटपालन, विद्युत उपकरणे दुरूस्ती, वराह पालन, खेळणी निर्मिती, मच्छीपालन, दिव्यांग उद्योग, भाजीपाला लागवड, औषधी वनस्पती लागवड, रेशीम उद्योग, मशरूम लागवड आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पी. डी. काटकर यांनी केले. यावेळी संचालक टेकाम, पी. एम. दहिकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक व्ही. एस. भोंबे, सहायक कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)