शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पेठा ग्रामपंचायतीत ४७ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST

या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अपहाराची रक्कम संबंधितांनी ३० जूनपर्यंत जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.

ठळक मुद्देचौकशी अहवालात ठपका : ग्रामकोष समित्यांसह सचिवांना नोटीस, ३० पर्यंत रक्कम भरण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील पेठा ग्रामपंचायतअंतर्गत पेठा आणि तोडका (स.) या दोन गावांमध्ये १०१४ पासून १४ वा वित्त आयोग, ५ टक्के अबंध निधी, तेंदूपत्ता बोनस यासह साहित्य खरेदीमधील मिळून एकूण ४७ लाखांचा अपहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. त्यासाठी तत्कालीन सरपंच, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष व सदस्यासह ग्राम सचिवांना जबाबदार धरण्यात आले आहे. सदर अपहाराची रक्कम येत्या ३० जूनपर्यंत संबंधित लेखाशिर्षात जमा करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (पंचायत) त्यांना दिले आहे.या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अपहाराची रक्कम संबंधितांनी ३० जूनपर्यंत जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.चौकशी अहवालानुसार, पेठा ग्रामकोष समितीचे अध्यक्ष चंद्रय्या भिमय्या तेलांम आणि सदस्य सत्यमा शंकर मुलकरी यांच्या कार्यकाळात पेठा ग्रामपंचायतअंतर्गत मौजा पेठा येथे ५ टक्के अबंध निधी, तेंदू बोनस आणि बिज भांडवलअंतर्गत मुरूम टाकण्याच्या कामात ५ लाख रुपये, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याच्या कामात १.५ लाख तर एलईडी दिवे बसविण्याच्या कामात २५ लाख ५९ हजार ४४० रुपयांचा अपहार झाला. त्यासाठी तेलांम आणि मुलकरी यांच्यासह तत्कालीन सचिव एच.एस.भारूडे यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात आले.पेठा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निला ऋषी पोरतेट असताना गाव नक्षलबंदी योजनेअंतर्गत २ लाख ७५ हजार २११ रुपये आणि १४ व्या वित्त आयोगातील योजनेअंतर्गत केलेल्या केलेल्या विकास कामात ६ लाख ४१ हजार २०० अशा एकूण ९ लाख १६ हजार ४११ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी तत्कालीन सरपंच पोरतेट यांच्यासह तत्कालीन सचिव एच.एस. भारूडे यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात आले.मौजा तोडका (स) येथे ५ टक्के अबंध निधी, तेंदू बोनस आणि बिज भांडवलअंतर्गत एलईडी दिवे बसविण्याच्या कामात ५ लाखांचा अपहार केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. त्यासाठी ग्रामकोष समितीचे अध्यक्ष हनमंतू निमय्या सोयाम आणि सदस्य अनिता रत्नाय्या सडमेक यांच्या तत्कालीन सचिव एच.एस. भारूडे यांना जबाबदार धरण्यात आले. याशिवाय सोलर ईन्वर्टर बसविण्याच्या कामात १ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तोडका (म) ग्रामकोष समितीचे अध्यक्ष रमेश किष्टय्या सडमेक व सदस्य कमला रोशय्या सडमेक यांच्यासह तत्कालीन सचिव भारूडे यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? याचा खुलासा करून अपहाराची रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत