बांधकाम विभागाचा विद्युत विभाग सोडला वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:37+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, कलेक्टर कॉलनी, सर्किट हाऊस, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय आदिवासी आश्रमशाळा आदींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे गडचिरोली येथे उपविभागीय कार्यालय आहे.

The electrical department of the construction department left the wind | बांधकाम विभागाचा विद्युत विभाग सोडला वाऱ्यावर

बांधकाम विभागाचा विद्युत विभाग सोडला वाऱ्यावर

ठळक मुद्देउंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार । पर्यवेक्षक-शिपायाकडे कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाºया काही इमारतींची विद्युत देखभाल ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत विभाग आहे. मात्र यातील अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने केवळ शिपाई व पर्यवेक्षकाच्या भरवशावर काम चालविले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, कलेक्टर कॉलनी, सर्किट हाऊस, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय आदिवासी आश्रमशाळा आदींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे गडचिरोली येथे उपविभागीय कार्यालय आहे. सदर कार्यालय जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात आहे. या कार्यालयात उपविभागीय अभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक व शिपाई ही पदे मंजूर आहेत. मात्र येथील उपविभागीय अभियंत्याचा प्रभार वर्धा येथील उपविभागीय अभियंत्याकडे सोपविला आहे. गडचिरोलीसाठी एक कनिष्ठ अभियंता हे पद आहे. मात्र या अभियंत्याकडे चंद्रपूर येथील प्रभार सोपविला आहे. त्यामुळे सदर अभियंता चंद्रपूर येथेच राहून कारभार हाकत असल्याचे दिसून येत आहे. आलापल्लीसाठी एका कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती आहे. त्याचीही चंद्रपूर येथेच बदली करण्यात आली व आलापल्ली येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता येथे राहात नाही. केवळ पर्यवेक्षक व शिपाई आहेत. तेच आता अभियंत्यांची कामे करीत असल्याचे दिसून येते. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या इमारतींच्या विद्युत व्यवस्थेची देखभाल ठेवण्यासाठी कंत्राट दिले जाते. सदर कंत्राटदार चांगली सेवा देईल यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागाची आहे. मात्र अभियंत्यासारखी तांत्रिक पदेच रिक्त असल्याने कंत्राटदारांवर नियंत्रण राहलेले नाही.

विद्युत दुरूस्तीकडे दुर्लक्ष
जिल्हा रूग्णालयातील विद्युतची देखभाल ठेवण्याची जबाबदारी एका कंत्राटदाराला देण्यात आली आहे. मात्र अधिकारीच राहात नसल्याने कंत्राटदरावरही नियंत्रण राहिलेले नाही. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे रूग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय व तालुका स्तरावरील शासकीय आश्रमशाळांमध्ये विलगीकरण कक्ष आहेत. मात्र त्याही ठिकाणचा वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

Web Title: The electrical department of the construction department left the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज