‎दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का, तिसऱ्यांदा हादरली अहेरी: नागेपल्ली, आलापल्ली परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:18 IST2026-02-26T12:18:32+5:302026-02-26T12:18:53+5:30

‎नेहमीप्रमाणे सर्वत्र शांतता असताना रात्री ११:५० च्या सुमारास अचानक जमिनीतून गूढ आवाज आल्यासारखे वाटले आणि काही सेकंद धक्के जाणवले.

Earthquake jolts South Gadchiroli at midnight, tremors felt for the third time: Panic in Nagepally, Alapalli areas | ‎दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का, तिसऱ्यांदा हादरली अहेरी: नागेपल्ली, आलापल्ली परिसरात घबराट

‎दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का, तिसऱ्यांदा हादरली अहेरी: नागेपल्ली, आलापल्ली परिसरात घबराट

‎गडचिरोली : अहेरी तालुक्यासह नागेपल्ली, आलापल्ली आणि जिमलगट्टा परिसरातील काही भागाला २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ११:५० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शांत निद्रेत असलेल्या नागरिकांना अचानक जमीन हादरल्याचा भास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नजीकच्या तेलंगणा राज्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
‎​
‎नेहमीप्रमाणे सर्वत्र शांतता असताना रात्री ११:५० च्या सुमारास अचानक जमिनीतून गूढ आवाज आल्यासारखे वाटले आणि काही सेकंद धक्के जाणवले. अहेरी शहरासह आजूबाजूच्या उपनगरांतही हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सुदैवाने या धक्क्यामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वारंवार होत असलेल्या या भूगर्भीय हालचालींमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

‎​भूकंपाची ही तिसरी वेळ

‎अहेरी परिसरासाठी भूकंप आता चिंतेचा विषय ठरत आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६:४८ वाजता ४.३ रिश्टर स्दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का

‎​तिसऱ्यांदा हादरली अहेरी: नागेपल्ली, आलापल्ली परिसरात घबराट

‎गडचिरोली : अहेरी तालुक्यासह नागेपल्ली, आलापल्ली आणि जिमलगट्टा परिसरातील काही भागाला २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ११:५० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शांत निद्रेत असलेल्या नागरिकांना अचानक जमीन हादरल्याचा भास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नजीकच्या तेलंगणा राज्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
‎​
‎नेहमीप्रमाणे सर्वत्र शांतता असताना रात्री ११:५० च्या सुमारास अचानक जमिनीतून गूढ आवाज आल्यासारखे वाटले आणि काही सेकंद धक्के जाणवले. अहेरी शहरासह आजूबाजूच्या उपनगरांतही हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सुदैवाने या धक्क्यामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वारंवार होत असलेल्या या भूगर्भीय हालचालींमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

‎​भूकंपाची ही तिसरी वेळ

‎अहेरी परिसरासाठी भूकंप आता चिंतेचा विषय ठरत आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६:४८ वाजता ४.३ रिश्टर स्केलच्या तीव्र धक्क्याने परिसर हादरला होता. त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री १२:४५ वाजता ३.८ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली होती. आता २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा धरती हादरल्याने, गेल्या चार वर्षांतील ही तिसरी वेळ ठरली आहे.

‎​दहशतीचे सावट, अनेक जण घराबाहेर 

‎वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांमुळे हा भाग भूकंपाच्या केंद्रस्थानी तर नाही ना? अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. रात्रीच्या वेळी धक्का बसल्याने अनेक कुटुंबांनी भीतीपोटी बराच वेळ घराबाहेर राहणे पसंत केले.केलच्या तीव्र धक्क्याने परिसर हादरला होता. त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री १२:४५ वाजता ३.८ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली होती. आता २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा धरती हादरल्याने, गेल्या चार वर्षांतील ही तिसरी वेळ ठरली आहे.

‎​दहशतीचे सावट, अनेक जण घराबाहेर 

‎वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांमुळे हा भाग भूकंपाच्या केंद्रस्थानी तर नाही ना? अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. रात्रीच्या वेळी धक्का बसल्याने अनेक कुटुंबांनी भीतीपोटी बराच वेळ घराबाहेर राहणे पसंत केले.

Web Title : गढ़चिरौली में आधी रात को भूकंप, अहेरी में तीसरा झटका

Web Summary : गढ़चिरौली के अहेरी और आसपास के इलाकों में देर रात भूकंप के हल्के झटके महसूस किए गए। निवासियों में दहशत फैल गई। बताया जा रहा है कि भूकंप का केंद्र तेलंगाना में था। पिछले चार वर्षों में यह तीसरी घटना है, जिससे व्यापक भय है।

Web Title : Gadchiroli Shaken by Midnight Earthquake; Third Jolt in Aheri

Web Summary : Aheri and nearby areas in Gadchiroli experienced mild earthquake tremors late at night. Residents panicked. The epicenter was reportedly in Telangana. This is the third such incident in the last four years, causing widespread fear.

टॅग्स :Earthquakeभूकंप