शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक नोंदणीने उडवली शेतकऱ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST

कोरेगाव (चोप) : शासनाच्या महसूल विभागाच्या अधिनस्त येत असलेल्या पीक पाहणी मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ...

कोरेगाव (चोप) : शासनाच्या महसूल विभागाच्या अधिनस्त येत असलेल्या पीक पाहणी मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲंड्रॉइड स्मार्ट मोबाईल फोन नाही. त्यामुळे ई-पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीच्या हंगामाची कामे सोडून त्यांना ई-पीक नोंदणी करून देण्याची विनंती करत गावातील स्मार्ट मोबाईल धारकांच्या मागे मागे फिरावे लागत

यापूर्वी गाव नमुना सातबारावर तलाठ्याकडून पिकाची नोंद केली जात होती. पण आता हे काम शेतकऱ्याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावे लागत आहे. ग्रामीण भागात ९० टक्के शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. बहुतांश शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना मोबाईलचे ज्ञानही नाही. ई-पीक ॲप डाऊनलोड करायचे काेठून? हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे.

१० टक्के लोकांच्या घरात मोबाईल असला तरी पाच टक्के लोक त्याच्या वापराबद्दल बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहेत. ई-पीक पाहणी द्वारे शेतातील पिकाची शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन नोंदणी करायची आहे. न केल्यास सातबारामधील पीक पेरा कोरा राहील असे सांगण्यात आले. यामुळे कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, धान खरेदी केंद्रावर धान विकता येणार नाही. तसेच अनुदानही प्राप्त होणार नाही. वन्य प्राण्यांनी पिकाचे नुकसान केले तरी ई-पीक नोंदणी नसेल तर ती जागा पडीक आहे असे समजले जाईल आणि शेतकरी भरपाई पासून वंचित राहतील.

हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना स्मार्ट फोनची आवश्यकता आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचा काेठून आणि कसा? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गावातील युवा अँड्रॉइड मोबाईल धारकांच्या मागे शेतकऱ्यांना कामे सोडून फिरावे लागत आहे.

(बॉक्स)

स्मार्ट फोन घेतला तरी इंटरनेटच नाही

- ऐन हंगामातच शासनाने १५ ऑगस्ट रोजी या ॲपचा शुभारंभ केला. यानिमित्ताने शेतकऱ्याच्या मुलाला वडिलांकडे अँड्रॉइड मोबाईल घेऊन मागण्यासाठी संधी मिळाली आहे. स्मार्ट फोन असल्याशिवाय आता समोर काही करता येणार नाही असे अनेक शेतकरी पुत्र आपल्या वडिलांना समजावून सांगत आहेत. मात्र फोन घेतला तरी ग्रामीण भागात इंटरनेट कव्हरेजचा अभाव आहे.

- ऑनलाईन पीक नोंदणीसाठी हजारो शेतकरी गुंतले असल्याने त्यांच्या शेतातील निंदण, खुरपणीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. धान पिकावर गाद खोडकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. पण तिकडे ही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर १५ सप्टेंबरपासून धान विक्रीसाठी नाव नोंदणी करायची असल्याने मध्येच त्यांना सप्टेंबर महिन्याचे सातबारे हवे आहेत. त्यासाठी तलाठ्याकडे बसून राहावे लागत आहे.