गडचिरोलीत ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 21:38 IST2018-04-28T21:38:10+5:302018-04-28T21:38:10+5:30

ड्युटीवर असताना पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

on duty sub-inspector committed Suicide in Gadchiroli | गडचिरोलीत ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोलीत ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली :  पोलीस मुख्यालयाजवळील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) लघु मुख्यालयात शनिवारी (28 एप्रिल) सायंकाळी ४.३५ वाजता एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:जवळील एके-४७ या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. राजेंद्र जानराव इंगळे (४८) असे त्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. इंगळे हे एसआरपीच्या नागपूर ग्रुपअंतर्गत बटालियन क्रमांक चारमध्ये कार्यरत होते. सायंकाळी ४.३५ वाजण्याच्या सुमारास ते वायरलेस विभागात ड्युटी करीत असताना अचानक स्वत:जवळील रायफल त्यांनी हनुवटीला लावून गोळी झाडली.

ती गोळी डोक्यातून आरपार निघून गेली. जागीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्या करण्यामागे नेमके कोणते कारण होते, याबाबतचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

Web Title: on duty sub-inspector committed Suicide in Gadchiroli