यात्रा काळात मंदिर दोन दिवस रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार
By Admin | Updated: February 16, 2015 01:22 IST2015-02-16T01:22:53+5:302015-02-16T01:22:53+5:30
मार्र्कंडा मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला असून यात्रेच्या प्रारंभीच्या दोन दिवस सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत मंदिर सुरू राहिल.

यात्रा काळात मंदिर दोन दिवस रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार
चामोर्शी : मार्र्कंडा मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला असून यात्रेच्या प्रारंभीच्या दोन दिवस सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत मंदिर सुरू राहिल. त्यानंतर यात्रेच्या काळात मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा.गो. पांडे, रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, उपाध्यक्ष किसन गिरडकर, सचिव केशव आंबटवार, अनिल चिंतलवार, रमेश पालारपवार यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला पोलीस निरिक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरिक्षक मनोज नवसरे आदी उपस्थित होते. १३ फेब्रुवारी रोजी शिवचरण नरसिंगदास सारडा यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. १७ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभी महापूजा होणार आहे. यावेळी पारंपारिक गुरव पुजारी पंकज पांडे व त्यांच्या पत्नी पूजा करतील. १८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता त्रिपूर पुजन २० फेब्रुवारीला बिजदर्शनाच्या दिवशी दुपारी २ वाजता मार्र्कंडेश्वराची पालखी काढण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रांगेतील पहिल्या वारकऱ्याचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात येणार ओह. मंदिर व मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी संरक्षक कठडे, मंडप पिण्याचे पाणी, निंबू शरब, राजू व्यास व सहकारी यांच्याकडून उपवास फराळ व नंतरच्या तीन दिवस ट्रस्टकडून महाप्रसाद, आपत्ती निवारण कक्ष, नदीतून पादचाऱ्यांना जाण्यासाठी रपट्याची व्यवस्था, अल्प विश्रांतीकरिता भक्त निवास आदी सुविधा करण्यात आल्या आहे, अशी माहिती विश्वस्तांनी दिली आहे.