शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
4
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
5
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
6
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
7
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
8
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
9
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
10
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
11
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
12
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
13
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
14
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
15
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
16
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
17
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
18
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
19
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
20
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आष्टीतील युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2015 00:07 IST

येथील धनराज विठ्ठल बैनलवार (२३) याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले.

आष्टी : येथील धनराज विठ्ठल बैनलवार (२३) याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी रात्रभर त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाही व सकाळी ७ वाजता चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले. परिणामी सदर युवकाचा मृत्यू झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर उईके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनराजच्या कुटुंबियांनी केली आहे.
धनराज बैनलवार यांचा सलूनचा व्यवसाय बुधवारी रात्रीचे जेवन केल्यानंतर तो झोपला असताना रात्री २ वाजताच्या सुमारास त्याच्या गळ्यात अचानक दुखायला सुरूवात झाली. ही बाब त्यांनी कुटुंबियांना सांगितल्यानंतर तत्काळ त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्रपाळीवर असलेले डॉ. उईके हे अनुपस्थितीत होते. डॉ. उईके यांना या बद्दलची माहिती फोनवरून देण्यात आली.
डॉक्टरवर करा कारवाई
आष्टीतील घटना : मृतकाच्या नातलगांची मागणी
आष्टी : आष्टी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके यांनी फोनवरूनच रूग्णालयातील परिचर्येला रुग्णाला सलाईन लावून उपचार करण्यास सांगितले. स्वत: मात्र सकाळी ५ वाजता रूग्णालयात आले. तोपर्यंत धनराजची प्रकृती अत्यंत खालावली असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. उईके यांच्या दुर्लक्षामुळे धनराजचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनराजच्या कुटुंबीयांनी केली आहे. मृत्यू झाल्याची माहिती कळताच आष्टी येथील नागरिकांनी रूग्णालयाच्या परिसरात गर्दी केली. डॉ. उईके यांनी धनराजला गुरूवारी सकाळी ५.३० वाजता रेफर केले असले तरी धनराजच्या वडिलांना दिलेल्या रेफर स्लीपमध्ये मात्र २.३० वाजताची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)