शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

थेट सबसिडीमुळे वितरक व ग्राहकांची डोेकेदुखी

By admin | Updated: January 6, 2015 22:59 IST

१ जानेवारीपासून राज्यासह गडचिरोलीत एलपीजी गॅसची सबसीडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. मात्र सध्या या योजनेमुळे ग्राहक व वितरक या

एसएमएसद्वारे बुकिंगची पध्दत बंद : गतवर्षी दिलेल्या कागदपत्रांची पुन्हा मागणी
दिगांबर जवादे - गडचिरोली
१ जानेवारीपासून राज्यासह गडचिरोलीत एलपीजी गॅसची सबसीडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. मात्र सध्या या योजनेमुळे ग्राहक व वितरक या दोघांचीही डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे गॅस वितरकाकडे ग्राहकांच्या रांगा दिवसभर दिसून येत आहे.
गतवर्षी १ जानेवारी २०१४ पासून थेट सबसिडी योजना गडचिरोली जिल्ह्यात लागू करण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यात १६ गॅस एजन्सी असून ८० हजारावर गॅस कनेक्शनधारक आहेत. यातील ५० टक्क्यापेक्षा अधिक ग्राहकांनी गेल्यावेळी आपले गॅस कनेक्शन आधार व बँक कार्डाशी लिंक केले होते. काहींना थेट सबसिडी त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा लाभही मिळाला. परंतु तत्कालीन सरकारने राजकीय दबावामुळे ही योजना मध्येच बंद केली.
गडचिरोली जिल्ह्यात योजना बंद झाल्यानंतर काही ग्राहकांनी गॅस वितरकाकडे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्याकरिता कागदपत्र दिले, असे ग्राहक आता सांगत आहे. मात्र योजना बंद झाल्यामुळे गॅस वितरकांनी ते लिंक करण्याचे काम थांबविले. आता नव्याने योजना कार्यान्वित झाल्याने त्याच ग्राहकांकडून पुन्हा तीच कागदपत्र मागितली जात आहे. त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत. मी मागेच हे कागदपत्र जमा केले, असे ग्राहक वितरकाला सांगत असल्याने वितरक व ग्राहक यांच्यात वाक्युध्द सुरू झाले आहे.
आता नव्याने पुन्हा सबसिडी घेण्यासाठी ग्राहकाला कागदपत्र द्यावे लागत आहे. शहरातील एचपी गॅसचे वितरक आधार कार्डावर स्कॅन केलेले कागदपत्रेच स्वीकार करीत आहेत, तर भारत गॅस कंपनीच्या एजन्सीमध्ये सर्व कागदपत्रे घेण्यात येत आहे. तसेच काही ग्राहकांनी गेल्यावेळीच आपले आधार कार्ड २ ते ३ बँकांच्या खात्याशी लिंक केले आहे. त्यामुळे गॅस वितरकांचा गोंधळ उडालेला आहे. आता पुन्हा नव्याने कागदपत्रे लिंकिगसाठी कार्यालयात आणून द्यावे, असे वितरक सांगत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना आपली कामे सोडून गॅस एजन्सीच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.
एसएमएसची पध्दत झाली बंद
मागीलवेळी गॅस कनेक्शन बुकिंग करताना ८८८८८२३४५६ या क्रमांकावर एसएमएस करून बुकिंग व्यवस्था होती. परंतु यावेळी या क्रमांकावर एसएमएस केल्यावर सिलिंडरसाठी बुकिंग होत नाही. आता पुन्हा फोनवरून बुकिंगची पध्दत लागू करण्यात आली आहे. एचपी गॅस कंपनीकडे मोबाईलमधून बुकिंग करण्यासाठी वरील क्रमांक डायल करा, मराठीसाठी १ दाबा, इंग्रजीसाठी २ दाबा, हिंदीसाठी ३ दाबा, त्यानंतर २३३५९२ दाबा, ग्राहक क्रमांक ---- दाबा, पुस्ती करण्यासाठी १ दाबा, बुकिंग करण्यासाठी ---- दाबा, यासाठी स्वत:चा मोबाईल वापरा, असे सांगितले जात आहे. अनेक ग्राहकांना ही किचकट बाब शक्य वेळेत आॅपरेट करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य गॅस ग्राहकांची अडचण वाढली आहे.