शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संचारबंदीमुळे कारल्यांची जावक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

माेहटाेला-किन्हाळा परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेतात कारल्यांची लागवड केली. पिकाला बरा दर मिळाणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. परंतु काेराेना ...

माेहटाेला-किन्हाळा परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेतात कारल्यांची लागवड केली. पिकाला बरा दर मिळाणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. परंतु काेराेना विषाणूचा संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही पाठ फिरविली. काही व्यापारी अल्प दरात कारल्यांची खरेदी करीत आहेत. परंतु या किमतीत कारले विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. तोडाईचा खर्चदेखील निघून येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कारले सडण्याच्या मार्गावर आहेत.

माेहटाेला परिसरात अनेक शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करून कारल्यांचे उत्पादन घेतात. येथील कारल्यांची चव आणि प्रत उच्च प्रतीची असल्याने चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी असते.

सुरुवातीला मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने येथील कारल्यांना थेट शेतात ४२ रुपये प्रती किलो दर मिळू लागला होता. परंतु संचारबंदी लागू झाल्याने बाहेरचे व्यापारी येथील कारले खरेदी अल्प दरात करीत आहेत.

बाॅक्स

संचारबंदीची सबब पुढे करून शेतकऱ्यांची लूट

देसाईगंज तालुक्यातील स्थानिक व्यापाऱ्यांनी कारल्यांच्या अल्प मागणीची व संचारबंदीची सबब पुढे करून ६ ते ७ रुपये प्रती किलो दराने मागणी केली. कारले पीक ऐन भरात असताना होत असलेली आवक पाहून दर पाडून खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. खरेदीदार मिळत नसल्याने शेतातील कारले तोडाई शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर होऊ लागली आहे.

बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसत असतानाच खरेदीदारांनी कारले खरेदीकडे पाठ फिरवल्याने लागवड खर्चही भरून निघण्याची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

===Photopath===

180421\18gad_3_18042021_30.jpg

===Caption===

ताेडणीच्या प्रतीक्षेत असलेले कारले.