शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या चुकाऱ्यासाठी कोरचीत चक्काजाम

By admin | Updated: June 24, 2015 02:35 IST

मागील पाच महिन्यांपासून थकलेले धानाचे चुकारे देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने कोरची-कुरखेडा मार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी चक्काजाम आंदोलन केले.

शिवसेनेचे आंदोलन : १५ खरेदी केंद्रावरील धान उत्पादक अडचणीत
कोरची : मागील पाच महिन्यांपासून थकलेले धानाचे चुकारे देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने कोरची-कुरखेडा मार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने कोरची तालुक्यातील वडेगाव, मनेली, बेतकाठी, बोरी, कोठरा, कोटगुल, गॅरापत्ती, रामगड, पुराडा, खेडेगाव, येंगलखेडा, मालेवाडा, चरवीदंड, कोरची या १५ ठिकाणी सुरू करून धानाची खरेदी करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत सुमारे १३ कोटी ५३ लाख ६० हजार रूपयांचे १९ हजार ४२९ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. मात्र मागील पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांना धानाचे पैसे देण्यात आले नाही. खरीप हंगामाला सुरूवात झाली असतानाही धानाचे चुकारे न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. ही गंभीर परिस्थिती शासनाच्या लक्षात आणून देऊन शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपप्रादेशिक कार्यालय कोरचीचे अधिकारी बालप्रसाद बरमकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. चुकारे आठ दिवसांत देण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व उपजिल्हा प्रमुख नंदकिशोर वैरागडे, दामेंद्र येवले, तालुका प्रमुख रमेश मानकर, रामसुराम काटेंगे, कृष्णा नरडंगे, सुरेश सोरते, तेजस मेश्राम, नरेंद्र सलामे, शांताराम जमकातन, दलसाय कुमरो, सुदू कोरचा, तुलाराम काटेंगे, तिलक उईके, सावजी बोगा आदी उपस्थित होते. आंदोलनामुळे कोरची-कुरखेडा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. (तालुका प्रतिनिधी)