नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: June 6, 2014 00:00 IST2014-06-06T00:00:32+5:302014-06-06T00:00:32+5:30
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे राज्य परिवहन महामंडळाचे दोन आगार आहेत. या आगारांतर्गत अनेक नादुरूस्त बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसगाड्या प्रवासादरम्यान बंद

नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे राज्य परिवहन महामंडळाचे दोन आगार आहेत. या आगारांतर्गत अनेक नादुरूस्त बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडून चालक-वाहकांना धक्का मारण्याची वेळ येते. कधीकधी तर गाडीतील प्रवाशी उतरवून त्यांना दुसर्या गाडीत बसवावे लागते व नादुरूस्त वाहनाजवळ परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना थांबून राहावे लागते, असे प्रसंग गडचिरोली जिल्ह्यातील या दोनही आगाराच्या बसगाड्यांबाबत नियमितपणे येत आहे.
आज गुरूवारी अहेरी आगाराची अहेरी-सिरोंचा ही बस रस्त्यात बंद पडली. त्यावेळी जिमलगट्टा गावाजवळ धक्का मारून बस सुरू करण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांना करावा लागला. अहेरी आगाराच्या अनेक जलद बसगाड्यांमधील आसनही गायब झालेले आहेत. काही बसगाड्यांच्या खिडक्यांचे तावदानही तुटलेले आहेत. तर काहींना काचा नाहीत, अशी परिस्थिती आहे. एकूणच या नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवाशी तर त्रस्त आहेत. पण परिवहन महामंडळाचे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. काही बस गाड्यांचे पत्रे ढिले झाल्याने त्या धावताना त्या प्रचंड कर्कश आवाज करतात. त्या आवाजामुळे बसमधील प्रवाशांचे डोके दुखण्याची वेळ येते. परंतु या सर्व प्रकाराकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष आहे. अहेरी आगार हे राज्यातील जुने आगार आहे. या आगारातून राज्याच्या विविध भागात बसगाड्या सोडल्या जातात. मात्र दिवसेंदिवस या आगाराची अवस्था आता बिकट होत चालली आहे.
गडचिरोली आगारात १0५ बसगाड्या आहेत. तर अहेरी आगारात ८0 बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक बसगाड्या र्जजर झालेल्या आहेत. अनेक बसगाड्यांचे आसन तुटलेले आहेत. काहींच्या छतांना छिद्र पडलेले आहेत. अनेक बसगाड्यांच्या खिडक्या निघून गेल्या असून तावदाणही तुटलेले आहेत. शिवाय पत्रेही तुटले आहेत. त्या दुरूस्त करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. या नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवासाला वेळही अधिक लागत आहे. तसेच या बसगाड्यांच्या वेगावरही र्मयादा आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)