औषध निर्माण अधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: June 23, 2014 23:51 IST2014-06-23T23:51:15+5:302014-06-23T23:51:15+5:30
सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत औषध निर्माण अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी

औषध निर्माण अधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन
गडचिरोली : सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत औषध निर्माण अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांना निवेदन सादर केले.
सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माण अधिकारी संवर्गात केंद्र शासनाच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने प्रारंभीक वेतन श्रेणी ९,३००-३८,८०० व ग्रेड पे ४२०० लागू करावा, औषध निर्माण अधिकारी यांना संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाही. त्यांना पदोन्नतीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात याव्या, फार्मसी अॅक्ट १९४८ कलम ४२ चे होत असलेले उल्लंघन टाळण्यासाठी ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयातील कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदांची पुनर्निर्मिती करून दोन पदे कायम करण्यात यावी, महाराष्ट्र सिव्हील मेडिकल कोड प्रकरण ९ परिच्छेद १२ नुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पदे निर्माण करावी, औषध निर्माण अधिकारी यांचे सेवा प्रवेश नियम अद्यावत करण्यात यावे, औषध निर्माण अधिकारी यांना उच्च शिक्षणासाठी शासनसेवेत कार्यरत असतांना केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेला ब्रिजकोर्स लागू करावा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कंत्राटी सेवेवर घेण्यात आलेल्या औषधी निर्माण अधिकाऱ्यांना २० हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संघटक विवेक मून, सालोटकर, हेमंत पेशट्टीवार, सुहास मेश्राम, वाघे, मंडापे, बुद्धावार, रामटेके, बुरांडे, अभिषेक गोधनकर, आंबडे, पिट्टलवार, साखरे यांनी केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून या समस्या सोडविण्याची मागणी आंदोलकर्त्यांनी केली. यावर सरकार कोणते निर्णय घेते, याकडे औषध निर्माण अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. समस्या न सोडविल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)