सिनेटमध्ये गुणवाढीच्या संशयाचे पडसाद; 'गोंडवाना' विद्यापीठाने फेटाळला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:27 IST2026-03-12T14:27:09+5:302026-03-12T14:27:40+5:30

Gadchiroli : गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाला फेब्रुवारी महिन्यात अचानक ठोकण्यात आलेल्या 'सील' मुळे निर्माण झालेल्या गुणवाढीच्या संशयाचे पडसाद १० मार्च रोजी झालेल्या सिनेट बैठकीत उमटले.

Doubts about grade enhancement echo in Senate; 'Gondwana' University rejects claim | सिनेटमध्ये गुणवाढीच्या संशयाचे पडसाद; 'गोंडवाना' विद्यापीठाने फेटाळला दावा

Doubts about grade enhancement echo in Senate; 'Gondwana' University rejects claim

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाला फेब्रुवारी महिन्यात अचानक ठोकण्यात आलेल्या 'सील' मुळे निर्माण झालेल्या गुणवाढीच्या संशयाचे पडसाद १० मार्च रोजी झालेल्या सिनेट बैठकीत उमटले. सिनेट सदस्यांनी या प्रकरणाचा जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, 'असा कोणताही प्रकार घडलेलाच नाही' असा दावा करत प्रशासनाने सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सिनेट बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य उपस्थित होते.

सिनेट सदस्यांनी विचारला जाब

फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मूल्यांकन विभागाला सील लावण्यात आले होते. यावरून माध्यमांमध्ये गुणवाढीच्या प्रकाराबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याचाच संदर्भ देत सिनेट सदस्य अजय लोंढे, यश बोबडे आणि संजय रामगिरवार यांनी प्रशासनाला जाब विचारला नेमके काय घडले? सील का लावले? आणि कारवाई काय झाली? असे सवाल करत सदस्यांनी जवळपास ३० ते ४० मिनिटे सभागृह गाजवले.

प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा

सदस्यांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू असतानाच, विद्यापीठ प्रशासनाने आपली बाजू मांडली. विद्यापीठात गुणवाढीचा कोणताही प्रकार मुळीच घडलेला नाही, हे सर्व आरोप निराधार आहेत, असे उत्तर जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले. प्रशासनाने हा सर्व प्रकार फेटाळून लावल्याने सध्यातरी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी शैक्षणिक वर्तुळात मात्र यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

"विद्यापीठात गुणवाढीचा असा कुठलाही प्रकार घडला नाही. सिनेटच्या बैठकीत सदस्यांना याबाबत योग्य ती उत्तरे देण्यात आली."
- डॉ. प्रवीण पोटदुखे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

Web Title : सीनेट में ग्रेड वृद्धि के संदेह की गूंज; गोंडवाना विश्वविद्यालय ने दावे को नकारा

Web Summary : गोंडवाना विश्वविद्यालय को एक विभाग की सीलिंग के बाद कथित ग्रेड वृद्धि को लेकर जांच का सामना करना पड़ा। सीनेट सदस्यों ने प्रशासन से सवाल किया, जिसने किसी भी गलत काम से इनकार किया। इनकार के बावजूद, अकादमिक हलकों में अटकलें जारी हैं।

Web Title : Senate Echoes Grade Inflation Suspicion; Gondwana University Denies Claim

Web Summary : Gondwana University faced scrutiny over alleged grade inflation after a department sealing. Senate members questioned the administration, which strongly denied any wrongdoing. Despite the denial, speculation continues in academic circles.