Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीपायी पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडून देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 08:23 IST2020-03-29T08:22:46+5:302020-03-29T08:23:10+5:30
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, आतापर्यंत असा कोणताही रिपोर्ट नाही, की ज्यात पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो असे म्हटले आहे.

Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीपायी पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडून देऊ नका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आदिवासी क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून सेवाकार्य देत असलेले डॉ. प्रकाश आमटे यांचा एक संदेश व्हायरल होत आहे. यात त्यांनी पाळीव प्राण्यांविषयीची काळजी व्यक्त केली आहे. ते यात म्हणतात, कोरोना हे जगावरचे मोठे संकट आहे. या संकटाला आपण सर्वजण धीराने तोंड देत आहोत. मात्र काही ठिकाणी असे आढळले आहे की, भीतीपोटी काही ठिकाणी नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना दूर नेऊन सोडत आहेत. हे पाहून मला अतिशय दु:ख झाले. आपण जाणताच मी पशुप्रेमी व पर्यावरणवादी आहे. आमच्याकडे गेल्या ४५ वर्षांपासून पाळीवर प्राण्यांसोबतच जंगली प्राणीही वास्तव्याला असतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, आतापर्यंत असा कोणताही रिपोर्ट नाही, की ज्यात पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांनाही घरात राहू द्या. त्यांना बाहेर नेऊन सोडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा.