शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

2015 मध्ये खर्चाचा हिशेब न देणाऱ्या उमेदवारांना अभयदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : २०१५ मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या, मात्र हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली ...

ठळक मुद्देयादीच गायब, तर यावेळी अपात्र ठरविणार कसे?

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : २०१५ मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या, मात्र हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाते. त्यांना पुढची निवडणूक लढविता येत नाही. त्यांनी अर्ज केल्यास त्यांचे अर्ज अपात्र ठरविले जाणे आवश्यक आहे. मात्र हिशेब सादर न करणाऱ्यांची यादीच गायब असल्याने अनेक अपात्र उमेदवारांना यावर्षीची निवडणूक लढण्यासाठी अभयदान मिळणार आहे.अशा पद्धतीने अभयदान मिळणे हा निवडणूक नियमाचा भंग आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अशी वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक काळात उमेदवारांकडून माेठ्या प्रमाणात पैसे खर्च हाेण्याची शक्यता राहते. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंगसुद्धा हाेऊ शकताे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीदरम्यान खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात येते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार सदस्य म्हणून निवडून येतात तेच निवडणूक विभागाकडे खर्चाचे विवरण सादर करतात. जे उमेदवार हारतात ते खर्च सादर करीत नाही. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाे उमेदवार खर्च सादर करत नाही त्याला अपात्र घाेषित केले जाते व पुढची निवडणूक लढता येत नाही. या नियमाचे पालन करण्यासाठी मागील वेळच्या निवडणुकीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा निवडणूक विभागाकडे असणे आवश्यक आहे. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत यादी निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती. गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, कुरखेडा, देसाईगंज, काेरची या सहा तालुक्यांमधील ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जांची तपासणीही करण्यात आली. पण ती करताना मागील निवडणुकीत खर्च सादर न करणारे कोण आहेत, याची माहितीच निवडणूक विभागाकडे नव्हती. मागील वेळी खर्च सादर न केलेल्या उमेदवारांनी यावेळीही अर्ज केला असेल तर नियमानुसार ताे अपात्र ठरविण्यासाठी यादी असणे आवश्यक हाेते. मात्र ही यादीच गायब असल्याने २०१५ मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचेही अर्ज पात्र ठरण्याची शक्यता आहे. पारदर्शकपणे निवडणूक पार पडावी, यासाठी निवडणूक विभाग अतिशय सतर्क राहते. 

ग्रामपंचायत माेठी तर खर्चाची मर्यादाही अधिक ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येवर खर्च मर्यादा अवलंबून आहे. सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींसाठी खर्च मर्यादा २५ हजार रुपये आहे. ११ ते १३ सदस्य संख्येसाठी ३५ हजार रुपये, १५ ते १७ सदस्य संख्येसाठी ५० हजार रुपयाची मर्यादा देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक