समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:35 IST2018-06-27T23:32:43+5:302018-06-27T23:35:03+5:30
प्रभाग क्रमांक ४ रामनगर परिसरात रिकाम्या भूखंडावर डुकर व पाळीव जनावरांचा हैैदोस राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्ते उखडलेले असल्याने पावसाळ्यात चिखल साचते. या समस्या मार्गी लावण्याबाबत आपण यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना निवेदन दिले होते.

समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रभाग क्रमांक ४ रामनगर परिसरात रिकाम्या भूखंडावर डुकर व पाळीव जनावरांचा हैैदोस राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्ते उखडलेले असल्याने पावसाळ्यात चिखल साचते. या समस्या मार्गी लावण्याबाबत आपण यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र दुर्लक्षितपणामुळे या समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे आता आपण पुन्हा समस्यांसंदर्भात स्मरणपत्र देत असून या समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक गुलाब मडावी यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी २५ जूनला नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, अटी व शर्तीनुसार १५ दिवसातून एकदा रामनगरातील नाल्यांचा उपसा होणे आवश्यक आहे. मात्र याकडे संबंधित कंत्राटदार व नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रामनगरातील बहुतांश नाल्या गाळाने तुंबल्या असल्याने दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून नाल्यांमध्ये फवारणी करावी, कचऱ्याचे ढिगारे इतरत्र हलवावे, अशी मागणी मडावी यांनी केली आहे.
रामनगरात दररोज नियमितपणे सकाळच्या वेळेत घंटागाडी येत नाही. ही समस्या मार्गी लावावी, रस्ते उखडल्यामुळे पावसाळ्यात चिखल निर्माण होत असते. त्यामुळे रस्त्यांची दुरूस्ती करावी, नवीन विद्युत खांब लावून पथदिव्यांची व्यवस्था करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.