नक्षलवाद्यांना मदत करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:19 IST2018-07-28T00:17:38+5:302018-07-28T00:19:15+5:30
शनिवार २८ जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे. या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मुळीच मदत व सहकार्य करू नये, असे आवाहन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केली.

नक्षलवाद्यांना मदत करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : शनिवार २८ जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे. या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मुळीच मदत व सहकार्य करू नये, असे आवाहन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिमलगट्टाच्या वतीने २५ ते २७ जुलैदरम्यान तीन दिवस जिमलगट्टा जनमैत्री मेळावा व निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटन समारोहात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार गुरूनुले, वैद्यकीय अधिकारी पडोळे, जिमलगट्टाचे प्रभारी पोलीस अधिकारी साईनाथ सुरवसे, पोलीस उपनिरिक्षक सूरज निंबाळकर, पं.स. सदस्य प्रांजली शंभळकर उपस्थित होते. मेळाव्यात योजनांची जनजागृती करण्यात आली. संचालन पीएसआय अभिजीत भोसले यांनी केले.