शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. ला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: September 16, 2014 23:44 IST

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना रिक्त पदांचे ग्रहण लागले असून यातून जिल्हा परिषदसुद्धा सुटलेली नसून जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ८ हजार ७१४ मंजूर पदांपैकी सुमारे ४९४ पदे रिक्त आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना रिक्त पदांचे ग्रहण लागले असून यातून जिल्हा परिषदसुद्धा सुटलेली नसून जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ८ हजार ७१४ मंजूर पदांपैकी सुमारे ४९४ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांची सुमारे ७४ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाच्या बहुतांश योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषदेचे विशेष महत्व असल्यानेच जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असे संबोधले जाते. गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये एकुण ८ हजार ७१४ पदे मंजूर आहेत. यामध्ये ‘अ’ गटाच्या अधिकाऱ्यांची १६१ पदे , ‘ब’ गटाच्या अधिकाऱ्यांची २२७, ‘क’ गटाची ७ हजार ५४२ तर ‘ड’ गटाची ७८४ पदे मंजूर आहेत. यापैकी ‘अ’ गटाची ७४, ‘ब’ गटाच्या अधिकाऱ्यांची ३५, ‘क’ गटाच्या कर्मचाऱ्यांची ३६३ तर ‘ड’ गटाच्या कर्मचाऱ्यांची २२ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षण, आरोग्य, रस्ते, सिंचन, पशुपालन, कृषी आदी महत्वाचे विभाग येतात. या सर्व विभागाच्यावतीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेकडो योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र निर्णय घेणाऱ्या अधिकारी व प्रत्यक्ष अंमबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीमध्ये फार मोठी अडचण निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलप्रभावीत, जंगलांनी व्यापलेला व आदिवासी बहुल आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करण्यास तयार होत नाही. परिणामी अधिकारी वर्गाची सुमारे ४६ टक्के पदे रिक्त आहेत. एखाद्या अधिकाऱ्याची गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्यानंतर सदर अधिकारी वैद्यकीय रजा टाकुन कर्तव्यावर रूजू होत नाही. या कालावधीत तो सर्वच मार्गाचा वापर करीत गडचिरोली जिल्ह्यातील नियुक्ती रद्द होण्यासाठी प्रयत्न करतो. जिल्हा परिषदेबरोबरच इतर कार्यालयांची परिस्थितीसुद्धा फारशी भिन्न नाही. गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण विभागाची सुमारे २३ हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. एकुण मंजूर पदांच्या रिक्त पदांचे प्रमाण सुमारे १०.२१ टक्के एवढे आहे. रिक्त पदांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने कार्यरत कर्मचारीही त्रस्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या तालुक्यांमध्ये रिक्त पदे ठेवू नये, असा नियम असला तरी हा नियम अजूनपर्यंत कधीच पाळल्या गेला नाही. रिक्त पदे भरण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दिले असले तरी रिक्त पदांचे ग्रहण कायमच आहे. (नगर प्रतिनिधी)