शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले २२ डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून गट ‘अ’ च्या २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ...

ठळक मुद्देतीन वर्ष सेवा बंधनकारक : जिल्हा निवड समितीने पाठविले नियुक्तीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून गट ‘अ’ च्या २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली आहे. या नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था थोडीफार सक्षम होण्यास मदत होईल.जिल्हा निवड समितीमार्फत १ एप्रिल रोजी गट ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमधील २८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल गुप्ता, सहायक समाज कल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर आदींच्या चमूने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्याबरोबर उमेदवारांना त्यांच्या मेलवर नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात रूजू होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.नियुक्ती दिलेल्या डॉक्टरांना तीन वर्ष सेवा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. हे बंधन मान्य करणाºया उमेदवारांनाच नियुक्ती देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासी बहुल व दुर्गम आहे. या भागात सेवा देण्यास डॉक्टर तयार होत नाही. नियुक्ती झालेले डॉक्टर सेवा सोडण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे डॉक्टरांची पदे नेहमीच रिक्त राहतात. मागील एक महिन्यापासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.कोरोनाची लागण गडचिरोली जिल्ह्यात झाल्यास पुरेसे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर नियुक्तीची प्रक्रिया अतिशय गतीने पार पाडण्यात आली आहे. नवीन डॉक्टर यांच्या नियुक्तीमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा थोडीफार सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे दिसून येत आहे.व्हिडिओ कॉन्फरंिन्सगद्वारे मुलाखतीडॉक्टर पदासाठी भंडारा, नागपूर, नांदेड, बिड आदी जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या उमेदवारांना केवळ मुलाखतीसाठी गडचिरोली येथे बोलविणे संयुक्तीक नव्हते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यात पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे डॉक्टरांना नियुक्ती देण्यात आली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीdoctorडॉक्टर