शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक एटापल्लीत पोहोचले

By admin | Published: February 19, 2017 1:09 AM

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार

एटापल्ली : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी अहेरी उपविभागातील चार तालुक्यात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी एटापल्ली येथे निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेतला. एटापल्ली हा अहेरी उपविभागातील संवेदनशील तालुका आहे. अहेरी उपविभागात चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दुपारी २ वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने एटापल्ली येथे पोहोचले. त्यांच्या समावेत प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अप्पर पोलीस अधीक्षक डी. राजा, उपविभागीय पोलीस अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयात निवडणूक कामाबाबत अर्धा तास बैठक घेतली. यावेळी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संपत खलाटे, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नितीन जाधव, ठाणेदार शिवाजी राऊत आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंडळ कार्यालयातील मतमोजणी होणार असलेल्या जागेची पाहणीही केली. त्यानंतर परत ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले. येथे त्यांनी एटापल्ली तालुक्यातील निवडणूक केंद्र व सुरक्षा विषयक बाबी यांच्याबाबत माहितीही जाणून घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही निवडणूक कामाबाबतची माहिती जाणली. (तालुका प्रतिनिधी)