शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

चौकाच्या नामफलकावरून दोन गटांत वाद

By admin | Updated: May 29, 2016 01:32 IST

शहरातील गांधी वॉर्डात महात्मा गांधी विद्यालयाजवळील नवीन वसाहतीत चौकाच्या नामफलकावरून दोन गटांत वाद..

गांधी वॉर्डातील स्थिती : अवैध नामफलकदेसाईगंज : शहरातील गांधी वॉर्डात महात्मा गांधी विद्यालयाजवळील नवीन वसाहतीत चौकाच्या नामफलकावरून दोन गटांत वाद निर्माण झाला असून यामुळे तणावाची परिस्थिती तयार झाली आहे. रेल्वेच्या मागे असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाला लागून नवीन वसाहत वसली आहे. चौकाचे नामफलक लावण्यासाठी २० घरांमधील नागरिकांनी ७ मे ला नगर पालिकेला निवेदन दिले. व अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ओमशांती कॉलनी असे नामफलकाचे विमोचन केले. त्यानंतर आणखी ४० ते ५० नागरिकांनी १३ मे रोजी ठराव घेऊन २५ मे रोजी आनंदनगर नावाचे नामफलक लावले व जुने नामफलक उद्ध्वस्त केले. या नामफलकांवरून दोन्ही गटात तणाव निर्माण झाला आहे. गांधी वॉर्डातील नामफलक प्रकरण पोलीस स्टेशन व नगर परिषदेपर्यंत पोहोचले आहे. देसाईगंज नगर पालिकेतील १७ वॉर्ड अधिकृत नावानुसार ओळखले जात असताना वॉर्डात अनेक ठिकाणी स्वमर्जीने नागरिकांनी बेकायदेशीरपणे अनाधिकृत नामफलक लावले आहेत. मतदारांचा रोष ओढू नये यासाठी नगरसेवकही अशा नामफलकांना पाठिंबा देत असल्याचे उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर पालिका क्षेत्रात अशा प्रकारचे बेकायदेशीर नामफलक लावता येत नाही. अशा नामफलकांवर कारवाई करणे आवश्यक असतानाही नगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नगर पालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावले जात असल्याने हे फलक लावण्याची स्पर्धा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी कठोर पाऊल उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.