शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकास आराखड्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने आराखडा तयार करण्याची संकल्पना केंद्र शासनाने मांडली आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय कार्यशाळा : ग्रामसेवक, सरपंच, ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाच्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा तयार करण्याविषयी जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरूवारी चर्चा करण्यात आली.कार्यशाळेला नवनिर्वाचित आ.डॉ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, समाजसेवक देवाजी तोफा, गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम आदी उपस्थित होते. कार्यशाळेला जिल्हाभरातील ग्रामसेवक, ग्रामसभांचे अध्यक्ष, सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने आराखडा तयार करण्याची संकल्पना केंद्र शासनाने मांडली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने विकास आराखडा तयार करावा, या उद्देशाने नवनिर्वाचित आ. डॉ. होळी यांनी स्वत: पुढाकार घेऊन ग्रामसेवक व ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ. होळी यांनी केंद्र शासन गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतीबरोबरच गावातील नागरिक जोडधंदा करून स्वत:ची प्रगती साधतील, यासाठी गावकºयांना रोजगाराचे प्रशिक्षण दिले पाहिजे, गावासभोवतालच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ देऊ नका, भावी पिढ्यांसाठी सदर जमीन आवश्यक आहे. या जमिनीचे सर्वेक्षण करून हद्द कायम करा, असे मार्गदर्शन केले. समाजसेवक देवाजी तोफा यांनी ग्रामसभा दिवसा न घेता रात्री घ्यावी, जेणेकरून सर्व नागरिक ग्रामसभेला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतील, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अमित माणुसमारे यांनी केले.