आश्रमशाळा समस्यांवर चर्चा
By Admin | Updated: September 26, 2015 01:22 IST2015-09-26T01:22:14+5:302015-09-26T01:22:14+5:30
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे गुरूवारी नागपूर येथे आले असताना विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार ....

आश्रमशाळा समस्यांवर चर्चा
अन्नधान्य नसल्याचा मुद्दा मांडला : वडेट्टीवार आदिवासी विकास मंत्र्यांना भेटले
गडचिरोली : आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे गुरूवारी नागपूर येथे आले असताना विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भेट घेऊन आदिवासी विभागाच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा केली.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या अनेक वसतिगृह आणि आश्रमशाळेत अन्नधान्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. बहुतांश विद्यार्थ्याजवळ पुस्तक व वह्या नाहीत, शालेय गणवेश नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कंत्राटदाराच्या मार्फतीने पुरवठा करण्यात येत असलेले साहित्य निकृष्ट दजार्चे असून ब्लँकेटचा दर्जा निम्न आहे.
पुरवठा करण्यात येणारे साहित्याचे दर बाजारभावापेक्षा जास्त आहे. यासह अनेक सोयीसुविधींबाबत ना. सावरांसोबत आ. विजय वडेट्टीवार यांनी चर्चा केली.
येत्या काही दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्या निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (जिल्हा प्रतिनिधी)