कर्मचाऱ्यांची डीएचओसोबत चर्चा
By Admin | Updated: August 9, 2014 23:43 IST2014-08-09T23:43:42+5:302014-08-09T23:43:42+5:30
कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भंडारी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे

कर्मचाऱ्यांची डीएचओसोबत चर्चा
गडचिरोली : कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भंडारी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन डॉ. भंडारी यांनी दिले.
शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांच्या गोपनीय आहवालाची प्रतवारी नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात यावी, पदोन्नतीतील एनटी प्रवर्गातील अनियमितता निस्तारण्यासाठी प्रकरण समितीसमोर ठेवण्यात यावे व योग्य न्याय देण्यात यावा, आरोग्य कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांना तालुका व जिल्हास्तरावर मोफत आरोग्यसेवा पुरविण्यात यावी, उन व पाऊस यापासून औषधांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे मेडिसीन बॅग आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावे, जिल्हा प्रशिक्षण केंद्रात महिला कर्मचाऱ्यांची सतत प्रशिक्षण राहत असल्याने या ठिकाणी एका एलएचव्हीची प्रतिनियुक्ती करण्यात यावी, पदोन्नतीची प्रक्रिया दर सहा महिन्यांनी राबविण्यात यावी, कर्मचाऱ्यांना स्थायी व नियमित करण्याची प्रक्रिया दर महिन्यात राबविण्यात यावी, सेवा ज्येष्ठता यादी दर वर्षात प्रकाशित करावी, जिल्ह्यात डेंग्यू सदृष्य रूग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रत्येक उपकेंद्राला एक कंत्राटी आरोग्यसेवक देण्यात यावा, कास्ट्राईब संघटनेचा एक कर्मचारी जिल्हा मुख्यालयात यावा, आरोग्य विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या आरोग्य सहायक यांना त्यांच्या प्रतिष्ठा व दर्जानुसार कामांचे नियोजन देण्यात यावा, आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान डीएचओंनी मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
चर्चेदरम्यान कॉस्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, कॉस्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक चौधरी, सचिव रायसिंग राठोड, कोषाध्यक्ष कमलेश झाडे, कार्याध्यक्ष एम. एम, बोडूवार, अशोक देवगडे, म्हशाखेत्री, हिराजी गेडाम, विनायक ओलालवार, पंकज लिंगायत, कुंभारे, हिरामण नरोटे, नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा माया सिरसाट, कल्पना रामटेके, हलामी आदी कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)