शेतकऱ्यांनो हेक्टरी पाच हजार अनुदान मिळाले का? लाभ घेण्यासाठी काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:24 IST2025-02-28T15:22:26+5:302025-02-28T15:24:30+5:30

Gadchiroli : ५६९ शेतकऱ्यांनीच ई-केवायसी केलेली आहे.

Did the farmers get subsidy of 5000 hectares? What to do to get the benefit? | शेतकऱ्यांनो हेक्टरी पाच हजार अनुदान मिळाले का? लाभ घेण्यासाठी काय करावे?

Did the farmers get subsidy of 5000 hectares? What to do to get the benefit?

गोपाल लाजूरकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
सन २०२३ या खरीप हंगामात भाव पडल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने ५ हजार रुपये प्रतिहेक्टर कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले होते. सदर योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ४ हजार ७४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यांची माहितीसुद्धा ऑनलाइन अपलोड करण्यात आली; परंतु २ हजार ६०४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने ह्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळालेला नाही. 


खरीप हंगाम २०२३ मध्ये ई-पीक पाहणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, तसेच खरीप २०२३ मध्ये ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली नाही तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे वैयक्तिक सामाईक व खातेदार हेक्टरी पाच हजार रुपयांच्या अर्थसाहाय्यास पात्र ठरले होते. २ कोटी ४५ लाख ९६ हजार १२३ रुपयांचे अर्थसाहाय्य कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत केली जाणार आहे; परंतु ई-केवायसी पेंडिंग आहे.


पोर्टलवर करावी खातरजमा
पात्र शेतकरी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असलयाबाबत खातरजमा करण्यासाठी www.scagridbt.mahait.org या पोर्टलला भेट देऊ शकतात. तसेच संबंधित कृषी सहायक किंवा गावातील तलाठी यांच्याशी संपर्क करू शकतात. शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लवकर संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी.


ई- केवायसी प्रलंबीत असलेले शेतकरी
तालुका                 कापूस                सोयाबीन 

आरमोरी                  ०५                        ०५
गडचिरोली               ११०                       ०५
चामोर्शी                  १४८८                     ४६
मुलचेरा                   ३७३                       ०१
अहेरी                      ३६८                      ००
सिरोंचा                    २०३                       ००


"वैयक्तिक खातेदारांना आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित कृषी सहायकांकडे सादर करणे आवश्यक आहे."
- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Did the farmers get subsidy of 5000 hectares? What to do to get the benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.