धानोराचा पेट्रोलपंप डोकेदुखी
By Admin | Updated: June 6, 2014 00:00 IST2014-06-06T00:00:12+5:302014-06-06T00:00:12+5:30
येथे गेल्या काही वर्षापासून नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले. मात्र या पेट्रोलपंपामध्ये जुन्या मशीन लावण्यात आल्या आहे. यामुळे या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलअभावी प

धानोराचा पेट्रोलपंप डोकेदुखी
धानोरा : येथे गेल्या काही वर्षापासून नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले. मात्र या पेट्रोलपंपामध्ये जुन्या मशीन लावण्यात आल्या आहे. यामुळे या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलअभावी परत जावे लागत आहे. परिणामी सदर पेट्रोल पंप वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
धानोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी एकच पेट्रोलपंप आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून धानोरा तालुक्यात वाहनांची संख्या वाढली आहे. या पेट्रोल पंपावर तालुक्यातील मुरूमगाव, सावरगाव, मालेवाडा, रांगी, गोडलवाही, पेंढरी या गावातून तसेच सभोवतालच्या परिसरात वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी वाहने घेऊन येतात. मात्र मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने या वाहनधारकांना पेट्रोलअभावी परत जावे लागते. या पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी, शौचालय व मुत्रीघराची व्यवस्था नाही. उन्हाळ्यात प्रचंड उन्हात रांगेत राहून पेट्रोल भरावे लागते. या पेट्रोल पंपावरील मशीन बंद पडत असल्याने अनेकदा वाहनधारकांना किरकोळ दुकानदारांकडून जादा दराने भेसळयुक्त पेट्रोल भरावा लागतो. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या पंपावर सोयी सुविधा निर्माण करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)