५० ड्रम गूळ व मोहफुलाचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:28+5:302021-06-06T04:27:28+5:30
वनरक्षक दिनेश हलामी हे वडलापेठ व रायपूर भागात गस्त घालत हाेते. दरम्यान, त्यांना दिना नदीच्या पात्रात जवळपास दोन ठिकाणी ...

५० ड्रम गूळ व मोहफुलाचा सडवा नष्ट
वनरक्षक दिनेश हलामी हे वडलापेठ व रायपूर भागात गस्त घालत हाेते. दरम्यान, त्यांना दिना नदीच्या पात्रात जवळपास दोन ठिकाणी एकूण ५० ड्रममध्ये गूळ व मोहसडवा टाकलेला आढळून आला. हातभट्टीवर तीन जण दारू गाळताना दिसून आले. वनरक्षक हलामी यांनी विचारणा केली असता संपूर्ण माल बोरी येथील इसमाचा असून, मजुरांच्या माध्यमातून अवैध दारू गाळण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले. हलामी यांनी यासंदर्भातील माहिती खमनचेरूचे क्षेत्र सहायक संतोष पडलावार यांना दिली. त्यांनी लगेच मुक्तिपथ तालुका चमूला घटनास्थळावर पाचारण केले. घटनास्थळावर शोधमोहीम राबविली असता मोहफुलाचा सडवा १० ड्रम व ४० ड्रम गुळाचा सडवा आढळून आला. जवळपास ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल घटनास्थळावर नष्ट करण्यात आला. ही कारवाई वनरक्षक दिनेश हलामी, वनमजूर हनुमंत सुमके, ग्रामपंचायत सदस्य संतोष आत्राम व मुक्तिपथ तालुका प्रेरक मारुती कोलावार यांनी केली.
===Photopath===
050621\05gad_3_05062021_30.jpg
===Caption===
वनकर्मचारी व मुक्तिपथ चमूने जप्त केलेला सडवा.