शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यापूर्वीच शिक्षकांच्या शहरी शाळेत प्रतिनियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ३१ मे पर्यंत करण्याबाबतचा शासन निर्णय ७ एप्रिल राेजी निर्गमित ...

गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ३१ मे पर्यंत करण्याबाबतचा शासन निर्णय ७ एप्रिल राेजी निर्गमित करण्यात आला. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सन २०२०-२१ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ४० पेक्षा अधिक शिक्षकांनी प्रतिनियुक्त बदल्यांचे आदेश प्राप्त करून घेतले. विशेष म्हणजे हे शिक्षक शहरी भागातील शाळांमध्ये रुजू झाले आहेत.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक बदली प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी शिक्षकांची बदली प्रक्रिया काेराेना प्रादुर्भावामुळे रद्द झाली. प्रशासनाला ही प्रक्रिया घेता आली नाही. आता ७ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार मे महिन्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच शहरी भागातील शाळांमध्ये बऱ्याच शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रतिनियुक्त्या मिळवून घेतल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

सन २०१७-१८ यावर्षी जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या माेठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून दुर्गम व अवघड क्षेत्रात नाेकरी करणाऱ्या शिक्षकांना इच्छीतस्थळी बदल्या मिळाल्या. त्याचवेळी शहरी भागात मागील २० वर्षांपासून दडून बसलेल्या शिक्षकांच्या दुर्गम भागात बदल्या करण्यात आल्या. त्याच शिक्षकांनी पुन्हा शिक्षण विभागाशी संधान साधून वेगवेगळे आजार व इतर कारणे दाखवून विभागीय आयुक्तांकडे बदलीचा प्रस्ताव सादर केला. प्रतिनियुक्ती बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षण विभागासह विभागीय आयुक्त कार्यालयात जाेरदार पाठपुरावा केला. दरम्यान या शिक्षकांनी गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, देसाईगंज या शहरी भागातील पंचायत समितीमधील सुगम शाळांमध्ये बदल्या करून घेतल्या.

प्रतिनियुक्ती बदली केलेल्या शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे दाेन वर्षांपूर्वीच शहरी भागातील शाळेतून बदली हाेऊन दुर्गम भागात गेले हाेते. आता ऑनलाइन बदल्यापूर्वीच या शिक्षकांनी प्रतिनियुक्ती बदल्याद्वारे जुन्याच पंचायत समितीमध्ये दाखल झाले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून दुर्गम व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय झाला असून काेराेनाकाळात करण्यात आलेल्या या प्रतिनियुक्ती बदल्यांमुळे प्रशासनाविरुद्ध दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बाॅक्स...

प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी

काेणत्याही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेची तीन वर्ष आस्थापनेच्या ठिकाणी पूर्ण करणे गरजेचे आहे. साधारणत: तीन ते साडेतीन वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या शासन नियमानुसार बदली केली जाते. मात्र शहरी भागातील शिक्षक दुर्गम भागातील शाळांमध्ये दीड ते दाेन वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा देत नाही. प्रतिनियुक्ती बदली करून साेयीस्कर शाळा मिळवून घेतात. परिणामी दुर्गम व अवघड भागातील शिक्षकांना सुगम तसेच शहरी भागातील शाळांमध्ये सेवा देण्याची संधी प्राप्त हाेत नाही. ऑनलाइन बदल्यापूर्वी विभागीयस्तरावरून झालेल्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या बदल्या रद्द करण्यात याव्या, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांनी केली आहे.