दुसऱ्या डोससाठी आलेले लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:39 AM2021-05-06T04:39:09+5:302021-05-06T04:39:09+5:30

मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात २ फेब्रुवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत २०४७ डोस देण्यात आले. तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य ...

Deprived of vaccinations for the second dose | दुसऱ्या डोससाठी आलेले लसीकरणापासून वंचित

दुसऱ्या डोससाठी आलेले लसीकरणापासून वंचित

Next

मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात २ फेब्रुवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत २०४७ डोस देण्यात आले. तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांत १० मार्चपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस ५४९ तर दुसरा डोस ९९ असे एकूण ६४८ डोस लस देण्यात आली. मात्र, बुधवारी लस संपल्याने अनेक नागरिक परत गेले.

लसीकरणाबाबत अनेकांमध्ये गैरसमज असल्याने नागरिकांचा लगाम परिसरात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिला डोस घेणारे १६८३, तर दुसरा डोस घेणारे ५७ जण आहेत. १०० डोस बोलेपल्ली उपकेंद्रात देण्यात आले. अडपल्ली (माल) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पहिला डोस ६२० जणांना, तर दुसरा डोस ८० जणांना असे एकूण ७०० डोस देण्यात आले.

Web Title: Deprived of vaccinations for the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.