शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामास बीएलओंचा नकार

By admin | Updated: September 17, 2014 23:47 IST

अधिकाऱ्यांकडून कानउघडणी : घरोघरी जावे लागणार

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून आम्हीच काम करायचे का, असा सवाल व मतदानाच्या दिवशी साधे पाणीही पाजत नसल्याची तक्रार करत विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला. तक्रारीच्या सुरात सर्वांनीच सूर मिसळविल्याने काहीसे वातावरण तंग झाले; परंतु त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला जाब विचारून कानउघडणी केल्याने अखेर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बीएलओंची बैठक तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश राठोड यांनी बोलावली होती. बीएलओ म्हणून प्रामुख्याने महापालिकेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, बैठकीला सुरुवात होताच एका बीएलओने तक्रार करायला सुरुवात केली. आमच्या शाळेत नऊ शिक्षकांपैकी सहा ते सात शिक्षकांना बीएलओचे काम सोपविण्यात आले, मग शाळा कशी चालवायची, असा सवाल करताच त्यांच्या सुरात बाकींच्यानीही सूर मिसळला. याद्यातील चुकांमुळे मतदारांचे पत्ते व घरे सापडत नाहीत, नागरिक व्यवस्थित माहिती न देता अपमानास्पद वागणूक देतात, अशी तक्रार करण्यात आली. मतदारांचे ओळखपत्र वाटप हे काम बीएलओंचे नसल्याचेही काहींनी सांगितले, तर काहींनी मतदानाच्या दिवशी दिवसभर उन्हातान्हात बसवून ठेवल्यावर साधी पाण्याचीही व्यवस्था प्रशासनाने केली नाही, अशी तक्रार केली. या साऱ्या तक्रारींशी सर्वच बीएलओ सहमत झाल्याने त्यांनी गलका करायला सुरुवात केली. अखेर तहसीलदार राठोड यांनी निवडणुकीची कामे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे असल्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत करावीच लागतील, असे सांगितले. तक्रार करणाऱ्या बीएलओ शिक्षकाच्या आजवर केलेल्या कामाचा आढावा घेण्यास राठोड यांनी सुरुवात करताच त्याची बोबडी वळाली. त्यानंतर मात्र सर्वांनी तक्रारीचा सूर बदलत शंका-समाधान करून घेतले. (प्रतिनिधी)