आंबेशिवणीत यांत्रिकी पद्धतीने धान रोवणी प्रात्यक्षिक
By Admin | Updated: July 24, 2014 23:52 IST2014-07-24T23:52:21+5:302014-07-24T23:52:21+5:30
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबेशिवणी येथे यंत्राद्वारे धान रोवणी प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आली. प्रत्यक्ष धान रोवणी यंत्राचा

आंबेशिवणीत यांत्रिकी पद्धतीने धान रोवणी प्रात्यक्षिक
गडचिरोली : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबेशिवणी येथे यंत्राद्वारे धान रोवणी प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आली. प्रत्यक्ष धान रोवणी यंत्राचा वापर करून यांत्रिकीकरणाचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आले. धान रोवणी यंत्राद्वारे धानाची रोवणी केल्यास लागवड खर्च अत्यंत कमी येतो व वेळेत रोवणी होत असल्याने उत्पादनातही वाढ होते. या उद्देशाने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत गटाचे अध्यक्ष प्रफुल भैसारे यांच्या शेतावर सदर प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी, शंकर सालोटकर, बाबुराव बावणे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष अनिता मडावी, सुनिल खोब्रागडे, माजी पं. स. सभापती माणिक झंजाळ, विजयकुमार अरगडे, उमेश शर्मा, हर्षल देशमुख आदी उपस्थित होते. आत्माअंतर्गत यांत्रिकीकरणाद्वारे जिल्ह्यातील बाराही तालुक्यात शेती शाळा व पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. लागवड खर्च कमीत-कमी व मनुष्यबळाचा कमी वापर व्हावा या उद्देशाने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून धान रोवणी केली जात आहे, अशी माहिती अनंत पोटे यांनी दिली. दरम्यान भैसारे यांच्या शेतात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यंत्राद्वारे धान रोवणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रात्यक्षिकाच्या आयोजनाकरिता गौतम जांभुळकर, नोजेंद्र लांडगे यांनी सहकार्य केले. यावेळी आंबेशिवणी येथील शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)