शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सकस चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक

By admin | Updated: July 21, 2014 00:12 IST

तालुक्यातील मुरखळा येथे कृषी विभागाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी शेतकऱ्यांना निकृष्ठ चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या

चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा येथे कृषी विभागाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी शेतकऱ्यांना निकृष्ठ चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करून दाखविण्यात आले.यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, जि.प. सदस्य राजू आत्राम, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी व्ही. जे. महाजन, कृषी विभागाचे उंदीरवाडे, देशमवाड, वाडीभस्मे, पशुधन विकास अधिकारी डॉ. देवकुळे, डॉ. सचिन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांचा एकमेव व्यवसाय शेती आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात आढळून येते. मात्र या पशुधनाची योग्य काळजी शेतकरी वर्गाकडून घेतली जात नाही. परिणामी या पशुधनाचे आयुष्यमान कमी आहे व कार्यक्षमतासुध्दा कमी आहे. पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस चारा मिळणे आवश्यक आहे. धानाची तणीस, सोयाबीन, तूर, चना, लाखोरी आदींच्या फोलापासून बनलेला कुटार यांचा वापर केला जातो. हा सर्व चारा व्यवस्थितरित्या ठेवल्या जात नाही. परिणामी त्याचा दर्जा खालावतो. त्याचबरोबर सदर चारा पशु पाहिजे त्या प्रमाणात खात नाही. दिवसेंदिवस जंगलाचे प्रमाण कमी होत चालल्याने गुरांना चराईसाठी जागा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे जंगलातही जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्याने जनावरांना घरच्या चाऱ्यावरच अवलंबून राहावे लागते. घरचा चाराही निकृष्ठ राहत असल्याने जनावरांचे आयुष्य व कार्यक्षमता कमी होते. कृषी विभागाकडून यावर्षी सकस चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविण्यात येत आहे. सकस चारा बनविण्याची पध्दत अत्यंत साधीसोपी आहे. प्रात्यक्षिकानंतर असंख्य शेतकऱ्यांनी सकस चारा बनविणे सुरूही केले आहे. याचा फायदा शेतकरीवर्गाला होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. (शहर प्रतिनिधी)