शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी नगर परिषदेसाठी लोकसंख्या अहवाल मागितला

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

आरमोरी येथे नगर परिषदेची निर्मिती करण्यासाठी शासनाने लोकसंख्येचा अहवाल मागितला असून वघाळा

अरसोडा गाव समाविष्ट : नगर परिषद स्थापनेतील अडचण दूरआरमोरी : आरमोरी येथे नगर परिषदेची निर्मिती करण्यासाठी शासनाने लोकसंख्येचा अहवाल मागितला असून वघाळा व अरसोडावासीयांनी नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविल्याने त्याऐवजी शेगाव, पालोरा व अरसोडा ही गावे समाविष्ट केली जाणार आहेत. आरमोरी येथील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र आरमोरी शहराची लोकसंख्या २० हजारांच्या जवळपास असल्याने या ठिकाणी नगर परिषद स्थापन करावी, यासाठी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नगर परिषद स्थापन होण्याकरिता २५ हजार लोकसंख्येची अट आहे. आरमोरी शहराची लोकसंख्या २२ हजार ५४६ एवढी आहे. नगर परिषद स्थापनेकरिता आणखी २ हजार ४५४ लोकसंख्येची गरज आहे. त्यामुळे आरमोरी शहराजवळ असलेल्या वघाळा व अरसोडा ही गावे नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याबाबत विचारमंथन सुरू झाले. मात्र या दोन्ही गाववासीयांनी ग्रामसभेत ठराव घेऊन नगर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगर परिषद निर्माण होण्यामागील अडचणी आणखी वाढल्या होत्या. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आरमोरी शहराची अधिकृत लोकसंख्या व या नगर परिषद क्षेत्रात आणखी नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांची नावे व एकूण लोकसंख्या सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते. अरसोडावासीयांनी आता जरी विरोध दर्शविला असला तरी २००४ साली ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन आरमोरी नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास सकारात्मकता दर्शविली होती. जिल्हा प्रशासनाने २००४ चा ठराव शासनाकडे सादर केला आहे. अरसोडा गावची लोकसंख्या २ हजार ६०० एवढी आहे. त्याचबरोबर आता नव्या प्रस्तावात शेगाव, पालोरा ही गावे सुद्धा नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. अरसोडावासीयांचा नगर परिषदेत समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला असला तरी शासनाने स्वत:चे अधिकार वापरल्यास सदर गावाला नगर परिषदेमध्ये समाविष्ट व्हावेच लागणार आहे. आरमोरी शहराची कमी असलेली लोकसंख्या हीच महत्त्वाची नगर परिषद स्थापनेमागील अडचण होती. शासनाच्या हस्तक्षेपामुळे ही अट दूर होणार आहे. त्यामुळे आरमोरी येथे नगर परिषद स्थापन होण्यामागील अडथळे दूर होऊन नगर परिषदेची स्थापना होण्याची आशा बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)