शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी अपघात विम्याची रक्कम देण्यास दिरंगाई

By admin | Updated: September 17, 2016 01:43 IST

नागपूरकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मे महिन्यात नागभिड तालुक्यात अपघात झाला.

नागभिडजवळ झाला होता अपघात : अनेकवेळा परत पाठविला प्रस्ताव
गडचिरोली : नागपूरकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मे महिन्यात नागभिड तालुक्यात अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यास अजुनही प्रवाशी सहाय्यता अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात आला नसल्याचा आरोप त्याचे वडील बब्बू शेख यांनी केला आहे.
गडचिरोली येथील लांझेडा वार्डातील विद्यार्थी साजीद बब्बू शेख हे २९ मे २०१६ रोजी काम्पा ते मोहाडी दरम्यान प्रवास करीत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. या अपघातात एक जण ठार व १४ प्रवाशी जखमी झाले. या जखमीमध्ये गडचिरोली येथील साजीद बब्बू शेख (१४) यांचाही समावेश होता. साजीद शेख यांच्या समावेत त्याचे वडील व आईही प्रवास करीत होते. आई-वडील दोघेही किरकोळ जखमी झाले. या तिघांची नागपूर ते गडचिरोली प्रवास तिकीट ५५२ रूपये झाली होती. यात अपघात विम्याचे प्रत्येकी एक रूपयाप्रमाणे तीन रूपये राज्य परिवहन महामंडळाने घेतले.
बब्बू शेख यांचा मुलगा साजीदचे दोन्ही पाय या अपघातात क्षतिग्रस्त झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी शेख यांना जवळजवळ दोन ते अडीच लाखांचा खर्च आला. हा खर्च केल्यानंतर जखमीचे वडील बब्बू शेख यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक गडचिरोली आगार यांच्याकडे अपघात विम्याच्या रक्कमेची मागणी केली. ही मागणी करताना शेख यांनी राज्यसरकारने सुरू केलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेचे सर्व निकष व त्या संदर्भातील पत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दाखविले व मुलाच्या सर्व वैद्यकीय खर्चाचे विवरणही शासनाच्या निकषानुसार गडचिरोली विभागीय एसटी कार्यालयात सादर केले. त्यानंतर या कागदपत्रांची तपासणी करून यातील त्रुटी एकाचवेळी बब्बू शेख यांना सांगणे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. मात्र असे न करता प्रत्येक आठ दिवसाने एक-एक त्रुटी सांगून अपघात विमा सहाय्यता निधी वितरित करण्याबाबतचे काम लांबविले जात आहे.
याबाबत बब्बू शेख यांनी गडचिरोली येथील एसटीच्या विभागीय नियंत्रकाची भेट घेतली. तर त्यांनी आम्हाला प्रवाशाकडून प्रत्येकी एक रूपया अपघात सहाय्यता निधीसाठी घेण्याच्या सूचना आहेत. मात्र अपघातात जखमी वा ठार झालेल्यांना रक्कम वितरित करण्याबाबत शासन आदेश अद्याप आलेला नाही, असे सांगून हात वर केले. त्यामुळे बब्बू शेख अतिशय कठीण मनस्थितीत सापडले असून एकीकडे मुलाच्या अपघातानंतर शस्त्रक्रियेसाठी लागलेला खर्च व मुलगा १२ वी असल्याने त्याच्या अभ्यासाच्या बाबतही कुटुंबाला प्रचंड चिंता आहे. परिवहन मंत्र्यांनी यांनी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी शेख यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

एसटी अपघातात मुलगा साजीद हा जखमी झाल्याबाबत वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळण्यासाठी बब्बू शेख यांनी कागदपत्रानिशी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र त्यांनी माझ्याशी थेट संपर्क न करता, इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा माझी भेट घेतली. तत्काळ आपण त्यांचा प्रस्ताव व कागदपत्रे नागपूरच्या डॉक्टरांकडे पडताळणीसाठी पाठविले. सदर प्रस्तावाबाबतची संपूर्ण प्रक्रिया आठवडाभरात त्यांना योजनेंतर्गत वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्यात येईल.
- व्ही. पी. गव्हाळे, विभागीय नियंत्रक, एसटी गडचिरोली