अवघड व सुगम शाळा विचार करून ठरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:36+5:302021-04-28T04:39:36+5:30
या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याचा बहुतेक भाग हा ...

अवघड व सुगम शाळा विचार करून ठरवा
या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याचा बहुतेक भाग हा अतिशय घनदाट जंगलाने व्यापला आहे. कुरखेडा तालुक्याचा बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व जंगली हिंस्र पशूंचा उपद्व्याप आहे. कुरखेडा तालुक्यात अनेक गावात दूरसंचार सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक भाग हा संवाद क्षेत्रात येत नाही. कुरखेडा तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ व डोंगरालगत आहे. त्यामुळे अशाही शाळांचा विचार करावा. कुरखेडा तालुक्याच्या अनेक गावाने अजून बसचा चेहराही पाहिला नाही. त्यामुळे राष्ट्रीय व राज्यमार्गापासून जवळ असलेल्या शाळासुद्धा अवघड क्षेत्रात घेण्यात याव्यात. मालेवाडा क्षेत्रातील सर्व शाळा ह्या अवघड शाळा म्हणून समावेश करण्यात यावा. कुरखेडा तालुक्यातील अनेक गावे ही महिलांसाठी राहण्याच्या दृष्टीने योग्य नसल्याने महिला प्रतिकूल गावांचीही नव्याने रचना करण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
विविध विभागाकडून आलेल्या प्रमाणपत्रानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष गौतम लांडगे, सरचिटणीस विनोद मंडकाम, कोषाध्यक्ष रमेश गुरनुले, सल्लागार प्रभाकर ठलाल उपस्थित होते.