गडचिरोली जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 12:05 IST2018-04-24T12:04:54+5:302018-04-24T12:05:14+5:30

आलापल्ली-आष्टी मार्गावरील लाभाणतांडा येथे सोमवारी रात्री ८ च्या सुमारास झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार झाली आहे.

Death of a woman in a truck-bike accident in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देधडक देऊन ट्रकचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आलापल्ली-आष्टी मार्गावरील लाभाणतांडा येथे सोमवारी रात्री ८ च्या सुमारास झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार झाली आहे.
पार्वती बालाजी पवार (२८) ही महिला आपल्या पतीसह लाभानतांडा येथे काही कामानिमित्त येत असताना त्यांच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली. यात पार्वती जखमी झाली. तिला गडचिरोलीला उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढल्याने त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. हा ट्रक बांबूची वाहतूक करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या महिलेला एक मुलगा व एक मुलगी आणि आप्त परिवार आहे. या अपघातात बालाजी पवार हेही गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Web Title: Death of a woman in a truck-bike accident in Gadchiroli district

टॅग्स :Accidentअपघात