शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल

By गेापाल लाजुरकर | Updated: August 7, 2023 19:00 IST2023-08-07T19:00:40+5:302023-08-07T19:00:57+5:30

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात ५ ऑगस्ट रोजी कुजलेल्या स्थितीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला.

dead body was found in a decomposed state in the field | शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल

शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात ५ ऑगस्ट रोजी कुजलेल्या स्थितीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात बामणी उप पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोचमपल्ली येथील मलय्या दुर्गम यांचे शेतात कपाशीची लागवड केली आहे. सदर कपाशीत एका इसमाचे प्रेत असून त्याची दुर्गंधी सुटल्याची माहिती गावात पसरली.

त्यावरून गावातील लोकांनी जाऊन पाहिले असता जवळपास ४० ते ४५ वयाच्या अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या स्थितीत दिसून आले. याबाबत बामणी उप पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. परंतु त्या व्यक्तीची अद्यापही ओळख पटली नाही. सदर इसमाची उंची अंदाजे ५ फुट ७ इंच आहे. त्याच्या अंगात कत्त्या रंगाची टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा फुल पॅन्ट आहे, असे बामणी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मदन मस्के, चौकशी अधिकारी पीएसआय संभाजी मुंडे यांनी कळविले.

Web Title: dead body was found in a decomposed state in the field