शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी सुरू आहे धोकादायक प्रवास

By admin | Updated: May 30, 2015 01:59 IST

एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने ...

एटापल्ली : एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने या भागातील शेकडो नागरिक याच नदीतून धोकादायक प्रवास करीत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.
एटापल्लीवासीयांना विविध कामासाठी आलापल्ली मार्गे गडचिरोली येथे जिल्हा मुख्यालयी जावे लागते. हे अंतर १४० किमी आहे. मात्र एटापल्ली मुक्कामी राहणारी एटापल्ली-चिमूर ही महामंडळाची बस अहेरीवरून महागाव मार्गे ये-जा करते. परिणामी या अंतरात पुन्हा १० किमीची भर पडते. त्यामुळे एटापल्ली ते गडचिरोली हे अंतर १५० किमी पडते. दीडशे किमीचा प्रवास करण्यासाठी एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना मोठे प्रवासभाडे मोजावे लागते. तसेच गडचिरोली गाठण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे शेकडो नागरिक पैसा व वेळेच्या बचतीकरिता देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीतून प्रवास करतात. एटापल्ली-चंदनवेली-गेदा मार्गावरून मुलचेरा तालुक्यातील देवदा गावावरून चामोर्शी तालुक्यातील रेगडीकडे जाण्यासाठी दिना नदीचाच मार्ग परवडण्यासारखा असून कमी अंतराचा आहे. मात्र शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना अद्यापही जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिना नदीवर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी एटापल्ली भागातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसाळ्यात मार्ग होतो बंद
जिल्ह्यात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक राहून पूर परिस्थिती निर्माण होते. दिना नदीलाही पावसाळ्यात तीन ते चारदा पूर येतो. मार्ग बंद होत असल्याने देवदा ते रेगडी या गावांचा संपर्क तुटतो. पुरामुळे नागरिकांचा सदर शार्टकट मार्ग बंद होतो.
दिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातून
दिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील जंगल पहाडीतून झाला आहे. दिना नदी मुलचेरा, अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जाऊन चौडमपल्ली येथील प्राणहिता नदीला मिळते. दिना नदीचा आधार घेऊन रेगडी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. हे विशेष. कमी अंतराकरिता रेगडी धरणावरून धोकादायक प्रवास होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पुलाच्या निर्मितीमुळे ५० किमीने अंतर कमी
देवदा-रेगडी दरम्यानच्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम केल्यास एटापल्ली तालुका गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील ५० किमीचे अंतर कमी होणार आहे. पुलाची निर्मिती झाल्यास एटापल्ली व मुलचेरा भागातील नागरिकांची वेळ व पैशाची बचत होणार आहे.