दगडूशेठची प्रतिकृती

By Admin | Updated: August 18, 2014 23:28 IST2014-08-18T23:28:19+5:302014-08-18T23:28:19+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशा आहे. गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंद व उत्साहाला पारावार उरत नाही. अशातच यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गडचिरोली शहरात जगप्रसिध्द असलेल्या पुणे

Dagaduheth's replica | दगडूशेठची प्रतिकृती

दगडूशेठची प्रतिकृती

गणेशोत्सव : गडचिरोलीतील कारागीर साकारणार
गडचिरोली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशा आहे. गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंद व उत्साहाला पारावार उरत नाही. अशातच यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गडचिरोली शहरात जगप्रसिध्द असलेल्या पुणे येथील शुक्रवार पेठेतील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. ही प्रतिकृती साकारण्याचे काम शहरातील प्रसिध्द मूर्तीकार राजेश पारटवार हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत.
युवा गणेश मंडळ गडचिरोलीच्यावतीने येथील आरमोरी मार्गावर दरवर्षी गणेशोत्सव साजरा केल्या जातो. यावर्षी या गणेशोत्सव मंडळाने दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेतला. सदर गणपतीची प्रतिकृती साकारण्याचे काम मूर्तीकार पारटवार यांना देण्यात आले. या मुर्तीच्या सजावटीसाठी मूर्तीकार पारटवार यांनी खास पुणे येथून चमकदार रंग आणले आहेत.
जगप्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीसाठी युवा गणेश मंडळाला १३ हजार रूपये मोजावे लागणार आहे. सदर मूर्ती ५ फूट उंचीची आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती येथील भाविकांना प्रत्यक्षात पहायला मिळणार आहे.
याशिवाय मूर्तीकार पारटवार हे सोनेरी रंगाची ५ फुटाची गणेश मूर्ती तसेच रेड्डी गोडाऊन परिसरातील डोक्यावर टोप नसलेली जम्बो गणेश मूर्ती साकारण्याचे कामही करीत आहेत. प्रत्येक गणेश मंडळाने वेगळ्या स्वरूपाच्या गणेश मूर्तीचे आर्डर दिले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Dagaduheth's replica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.