शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींना हुडकून काढा

By admin | Updated: March 10, 2015 23:58 IST

राज्यात सध्या गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात काही संस्थाचालक, सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

गडचिरोली : राज्यात सध्या गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात काही संस्थाचालक, सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. या प्रकरणात कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, दोषींना हुडकून काढावे व त्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केली आहे.राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ऐन परीक्षेच्या वेळी शिष्यवृत्ती मंजूर न झाल्यास त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे यांच्या विरूद्ध कारवाई झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती वाटप प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. राजपत्रित अधिकाऱ्याच्या अनाठायी बहिष्कारामुळे राज्यभरातील मागासवर्गीय पालक, विद्यार्थी व संघटना यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता, शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींना हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही ओबीसी कर्मचारी असोसिएशनने केली आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची काळजी शासनाने घ्यावी, असेही असोसिएशनने म्हटले आहे.