गडचिरोलीत सीआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 19:18 IST2020-04-26T19:17:50+5:302020-04-26T19:18:30+5:30
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन क्रमांक 37 मधील एका जवानाने आपल्याजवळील बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे रविवारी दुपारी घडली.

गडचिरोलीत सीआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन क्रमांक 37 मधील एका जवानाने आपल्याजवळील बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे रविवारी दुपारी घडली.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दीपककुमार असे मृत जवानाचे नाव असून तो उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे. दुपारी त्याने आपल्याजवळ असलेल्या इन्सास रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. ते ठिकाण गडचिरोलीपासून 200 किमीपेक्षा जास्त अंतरावर नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात असल्याने मृतदेह आणण्यासाठी गडचिरोलीवरून पोलीस दलाकडे असलेले हेलिकॉप्टर भामरागडला पाठविण्यात आले. गडचिरोलीत शवपरिक्षण केल्यानंतर मृतदेह उद्या उत्तराखंडकडे पाठविला जाईल. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली हे कळू शकले नाही