शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर महामंडळ गोदाम बांधणार

By admin | Updated: January 16, 2016 01:49 IST

गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून १८ लाख क्विंटल धान्याची खरेदी केली जाते.

विष्णू सावरा यांची घोषणा : आरमोरी व गडचिरोलीत नवीन गोदामाचे उद्घाटनआरमोरी/गडचिरोली : गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून १८ लाख क्विंटल धान्याची खरेदी केली जाते. मात्र धान्य साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे मागील काळात महामंडळाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याबाबीचा गांभीर्याने विचार करून राज्यभर गोदाम बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले. सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने आरमोरी व गडचिरोलीनजीकच्या नवेगाव येथे गोदाम बांधण्यात आले. याचे उद्घाटन ना. सावरा यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, स्वप्नील वरघंटे, आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक मांदाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, खासदार अशोक नेते यांनीही मार्गदर्शन केले. संचालन एस. एस. आचला, आभार विवेक कुंभार यांनी मानले. जिल्ह्यातील कार्यक्रम असूनही आदिवासी विकास राज्यमंत्री व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा सर्वत्र होती. (वार्ताहर)