जिल्हाधिकारी कार्यालयातील एक जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:55+5:30

रविवारी पाचजण कोरोना बाधित आढळले. त्यात गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेले तीन जण यामध्ये नवेगाव येथील रहिवासी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी, नागपूरवरून आलेला एक, स्थानिक एकाचा समावेश आहे. आरमोरी येथील एक परिचारिका व नागपूर येथून आलेला एका प्रवाशाचा समावेश आहे.

A coroner in the collector's office is infected | जिल्हाधिकारी कार्यालयातील एक जण कोरोना बाधित

जिल्हाधिकारी कार्यालयातील एक जण कोरोना बाधित

ठळक मुद्देरविवारी आठ जणांना लागण : पाच कोरोनामुक्त; ९६ जणांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी विभागातील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली आहे.
रविवारी पाचजण कोरोना बाधित आढळले. त्यात गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेले तीन जण यामध्ये नवेगाव येथील रहिवासी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी, नागपूरवरून आलेला एक, स्थानिक एकाचा समावेश आहे. आरमोरी येथील एक परिचारिका व नागपूर येथून आलेला एका प्रवाशाचा समावेश आहे. आठ जण कोरोनामुक्त झाले त्यात गडचिरोलीतील दोन, कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या ८९४ एवढी झाली आहे. ७९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्या ९६ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र आंतरजिल्हा बस वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यापासून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

Web Title: A coroner in the collector's office is infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.