Coronablast at Kurkheda in Gadchiroli; 14 positive | गडचिरोलीतील कुरखेडामध्ये कोरोनाब्लास्ट; १४ जण पॉझिटिव्ह

गडचिरोलीतील कुरखेडामध्ये कोरोनाब्लास्ट; १४ जण पॉझिटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील १४ जणांचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. यात शहरातील तीन सफाई कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले ११ रुग्ण तालुक्यातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात दाखल होते. यात तीन सफाई कामगारांचाही समावेश आहे. हे कामगार सेंटरची साफसफाई करत असल्याने व तेच कामगार शहरातही स्वच्छता करत असल्याने गावकऱ्यांमध्ये धास्ती आहे. यातील दोन कामगार रहात असलेला आझाद वॉर्ड व एक कामगार राहत असलेला धमदीटोलाचा काही भाग बंद करण्यात आला आहे. प्रथमच येथील सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने गावकºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Coronablast at Kurkheda in Gadchiroli; 14 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.