जांभळी येथे ६५ लोकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST2021-05-14T04:36:04+5:302021-05-14T04:36:04+5:30
पंचायत समिती कोरची अंतर्गत येत असलेल्या जांभळी येथे ११ मे राेजी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६५ लाेकांची काेराेना ...

जांभळी येथे ६५ लोकांची कोरोना चाचणी
पंचायत समिती कोरची अंतर्गत येत असलेल्या जांभळी येथे ११ मे राेजी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६५ लाेकांची काेराेना चाचणी करण्यात आली. यात ३ जण बाधित आढळून आले. बाधित रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले.
काेरची तालुक्यात रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच गावात फिरणाऱ्या नवीन रुग्णांना शोधून काढण्याच्या उद्देशाने जांभळी येथे हे शिबिर घेण्यात आले. सध्या तालुक्यात तेंदूपाने तोडणी सुरू आहे. अशा स्थितीत लाेकांना संसर्ग हाेऊ नये, यासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले. सध्या तालुक्यात महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपंचायत कोरचीतर्फे जनजागृती केली जात आहे. जांभळी येथील तपासणी शिबिराला कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी भेट देऊन पाहणी केली व लोकांना तपासणी व लसीकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार छगनलाल भंडारी, गटविकास अधिकारी डी. एम. देवरे, कृषी विस्तार अधिकारी आर. एम. दुधे, मोहन कुमरे, सरपंच ग्रामपंचायत जांभळी, सचिव वाय. एम. लाडे आदी उपस्थित होते. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी ही लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी. वेळीच उपचार झाल्यास व नियमांचे पालन केल्यास या रोगापासून काहीही धोका नाही. कोणीही विनाकाम बाहेर फिरू नये, नियमित मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मनात कुठलीही भीती न बाळगता प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन तहसीलदार छगनलाल भंडारी व गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी केले आहे.
===Photopath===
130521\13gad_1_13052021_30.jpg
===Caption===
जांभळी येथे लसीकरणाची पाहणी करताना एसडीओ शेंडगे.