शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पर्लकोटावरील जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:38 IST

जिल्ह्यातील भामरागडच्या घनदाट जंगलात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो; पण अलीकडे झपाट्याने जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे तापमानात दिवसागणित वाढ ...

जिल्ह्यातील भामरागडच्या घनदाट जंगलात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो; पण अलीकडे झपाट्याने जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे तापमानात दिवसागणित वाढ होण्यासोबतच भूजल पातळीही खालावत आहे. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रवती या तीनही नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळा संपताच कोरड्या पडतात.

यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.

भूजल पुनर्भरणाची गरज लक्षात घेऊन ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ ही राज्य सरकारची जुनीच संकल्पना गांभीर्याने राबविणे काळाची गरज झालेली आहे. शेजारील चंद्रपूर जिल्ह्यात जानाळा-पोंबुर्णा मार्गावरील अंधारी नदीवर

याच पद्धतीने जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात केले आहे. (बॉक्स)

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाढल्या अपेक्षा

गेल्या २० वर्षांपासून पर्लकोटा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. हे बांधकाम सुरू झाल्यानंतर वनविभागाच्या आडकाठीने पुन्हा थांबले होते. कंत्राटदारसुद्धा पळ काढण्याच्या तयारी होते; परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विशेष लक्ष देऊन मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्याने या कामातील अडथळे दूर होऊन हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून भामरागडवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नवीन पुलाच्या बांधकामानंतर जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्यासाठीही ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भामरागडवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.